Pune Fruit Market Rates: लिंबाची आवक वाढली, पण मागणी घटली; गोणीमागे ४०० रुपयांपर्यंत भाव घसरले

कच्च्या लिंबांना पुणेकरांचा प्रतिसाद कमी; डाळिंबाच्या दरात १० टक्क्यांनी वाढ
Lemon
LemonPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: लाडक्या गणरायाला निरोप दिल्यानंतर घरगुती ग्राहकांसह हॉटेल व्यावसायिकांकडून लिंबाच्या मागणीत वाढ होण्याच्या शक्यतेसह लिंबाच्या वाढलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी रविवारी शेतकरीवर्गाकडून लहान तसेच कच्च्या लिंबाची तोड करून बाजारात विक्रीस पाठवली.

Lemon
Pune Food Grain Rates: लांबलेल्या पावसाचा अन्नधान्यांच्या दरांना फटका; ज्वारी, डाळी महागल्या

बाजारात १ हजार २०० ते १ हजार ५०० गोण्यांमधून दाखल झालेल्या लिंबांमध्ये अपेक्षित रस नसल्याने तसेच ती कच्ची असल्याने त्याच्या खरेदी करण्याकडे पुणेकरांनी पाठ फिरवली. परिणामी, लिंबाच्या भावात १५ ते २० किलोच्या गोणीमागे तीनशे ते चारशे रुपयांनी घसरण झाली आहे. घाऊक बाजारात लिंबाच्या १५ ते २० किलोच्या गोणीला ४०० ते २३०० रुपये भाव मिळाला.

Lemon
Chakan Vegetable Market Rates: चाकण बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली; चवळी, गाजर, फरशी अन् हिरवी मिरचीचे भाव वधारले

बाजारात डाळिंब, ड्रॅगनफ्रुटला चांगली मागणी आहे. त्यातुलनेत आवक कमी असल्याने डाळिंबाच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. उर्वरित सर्व फळांची आवक-जावक कायम असल्याने त्यांचे गत आठवड्यातील दर टिकून होते.

Lemon
Pune Fish Market Rates: पुण्यात मासळीचे दर तेजीत; चिकन किलोमागे २० रुपयांनी महाग

गुलटेकडी येथील मार्केट यार्ड येथील फळबाजारात रविवारी लिंबू १२०० ते १५०० गोणी, मोसंबी ६० ते ७० टन, संत्रा २० ते २५ टन, डाळिंब ६० ते ६५ टन, पपई १५ ते २० टेम्पो, कलिंगड १५ ते २० टेम्पो, खरबूज ४ ते ५ टेम्पो, चिकू २००० डाग, पेरू ४०० ते ५०० क्रेट, पिअर ५ गाड्या, सीताफळ ४० ते ४५ टन, सफरचंद साडेचार ते पाच हजार बॉक्स, अननसाची ६ ट्रक इतकी आवक झाली होती.

Lemon
Pune University Mess Fee Hike: पुणे विद्यापीठातील मेसची १० रुपयांची दरवाढ मागे; विद्यार्थ्यांना दिलासा

फळांचे भाव पुढीलप्रमाणे:

लिंबे (प्रतिगोणी) : ४०० ते २३००, मोसंबी : (३ डझन) : ११०-२८० (४ डझन) : ३०-१००, संत्रा : (१० किलो) : १५०-७००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ८०-२५०, आरक्ता : १०-६०, गणेश : ५-४०, कलिंगड : ५-१५, खरबूज : १०-३०, पपई : १०-३०, चिकू (दहा किलो) : १००-६००, पेरु (२० किलो) : ७००-८००, अननस (१ डझन) : ३००-९००, सीताफळ (१ किलो) : ३०-२००, पिअर (२४ ते २५ किलो) : ३५००-४०००, बोरे (दहा किलो) : उमराण १५०-१७०, चेकनट ९००-१०००, चण्यामण्या ९००-११००, ड्रॅगन (१ किलो) : ८०-१३५, सफरचंद : काश्मीर डेलिशिअस (१४ ते १६ किलो) १२००-१६००.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news