Pune Fish Market Rates: पुण्यात मासळीचे दर तेजीत; चिकन किलोमागे २० रुपयांनी महाग

गणेशोत्सवानंतर मासळीला मागणी वाढली; गावरान अंड्यांच्या दरातही शेकड्यामागे ४० रुपयांची वाढ
Fish
Fish Pudhari File Photo
Published on: 
Updated on: 

पुणे: देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरून गणेश पेठ येथील बाजारात मासळीची आवक होत आहे. गणेशोत्सवानंतर मासळीला मागणी वाढली आहे. बाजारात होत असलेल्या मागणीनुसार व्यापाऱ्यांकडून मासळी मागविण्यात येत आहे. परिणामी, मासळीचे तेजीतील दर कायम आहेत. बाजारात दाखल होत असलेल्या पक्ष्यांच्या तुलनेत मागणी वाढल्याने चिकनच्या भावात किलोमागे वीस रुपयांनी वाढ झाली आहे.

Fish
Pune University Mess Fee Hike: पुणे विद्यापीठातील मेसची १० रुपयांची दरवाढ मागे; विद्यार्थ्यांना दिलासा

याखेरीज, गावरान अंड्यांच्या भावातही शेकड्यामागे चाळीस रुपयांनी वाढ झाली आहे. मटण आणि इंग्लिश अंड्यांमधील मागणी व पुरवठा यामध्ये समतोल असल्याने त्यांचे दर स्थिर असल्याचे सांगण्यात आले. गणेश पेठ येथील घाऊक बाजारात रविवारी (दि. २७) खोल समुद्रातील मासळी १५ ते २० टन, खाडीच्या मासळीची २०० ते ३०० किलो आणि नदीच्या मासळीची ४०० ते ५०० किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून १० ते १५ टन आवक झाली.

Fish
Pune Dry Day Illegal Liquor Sale: ‘ड्राय डे’ला पुण्यात अवैध मद्यविक्रीवर धडक; ६४ गुन्हे, ६२ आरोपी अटकेत

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):

पापलेट : कापरी : २०००, मोठे : १५००-१६००, मध्यम : ११००-१३००, लहान : ८००-१०००, भिला : ७००-८००, हलवा : ६००-७००, सुरमई ४००-७००, रावस : ७००-८५०, घोळ : ७००-८००, करली : ३५०-४००, भिंग : ३००-४००, पाला : १२००-१४००, वाम : पिवळी ६००-८००, काळी : ३००-४५०, ओले बोंबील : १००-१८०.

Fish
Maharashtra Tourism: परदेशी पर्यटकांची महाराष्ट्राला पसंती; पर्यटनातून स्थानिक रोजगाराला मोठी संधी

कोळंबी : लहान : १४०-२८०, मध्यम : ३००-४५०, मोठी : ५००-७५०, जम्बो प्रॉन्स : १४००-१५००, किंग प्रॉन्स : ७५०-८५०, लॉबस्टर : १८००-२०००, मोरी : ३००-४००, मांदेली : १००-१६०, राणीमासा : २४०-२८०, खेकडे : ३००-४००, चिंबोर्‍या : ६००-७००. खाडीची मासळी - सौंदाळे : २४०-२८०, खापी : २४०-२८०, नगली : ४८०, तांबोशी : ५००-५५०, पालू : ३००-४००, लेपा : २००-३००, बांगडा : २४०-२८०, शेवटे : २५०-३००, बेळुंजी : १२०-१८०, तिसर्‍या : २५०-३००, खुबे : १२०-१६० तारली : २५०-३००.

Fish
Pune Drought Affected Talukas: पुणे जिल्ह्यातील आठ तालुके दुष्काळग्रस्त; पीकनुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात होणार

नदीतील मासळी : रहू : १५०-१८०, कतला : १८०-२२०, मरळ : ३००-४००, शिवडा : २००-२५०, खवली : २००-२५०, आम्ळी : १२०-१४०, खेकडे : २५०-३५०, वाम : ४००-४५०. मटण : बोकडाचे ८४०, बोलाईचे ८४०, खिमा ८४०, कलेजी ८८०. चिकन २२०, लेगपीस २५०, जिवंत कोंबडी १४०, बोनलेस ३००. अंडी : गावरान (शेकडा) ११४० डझन १५६, प्रतिनग १२. इंग्लिश (शेकडा) ५७५, डझन ७८, प्रतिनग ६.५०.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news