Chakan Vegetable Market Rates: चाकण बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली; चवळी, गाजर, फरशी अन् हिरवी मिरचीचे भाव वधारले

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीत ५ कोटी ७० लाखांची उलाढाल; कांदा ४,६७५ तर लसणाला १८ हजार रुपये कमाल भाव
Vegetable
VegetablePudhari
Published on: 
Updated on: 

अविनाश दुधवडे

चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये तरकारी मालाची आवक वाढली. चवळी, गाजर, लिंबू, फरशी व हिरव्या मिरचीची आवक वाढूनही भाव वधारले. पालेभाज्यांची किरकोळ आवक झाली. एकूण उलाढाल ५ कोटी ७० लाख रुपये झाली.

Vegetable
Pune Fish Market Rates: पुण्यात मासळीचे दर तेजीत; चिकन किलोमागे २० रुपयांनी महाग

कांद्याची एकूण आवक १ हजार ०५० क्विंटल झाली. कांद्याला कमाल भाव १,५०० ते ४,६७५ रुपये मिळाला. बटाट्याची एकूण आवक २,००० क्विंटल झाली. बटाट्याला कमाल भाव १,५०० रुपये मिळाला. लसणाची एकूण आवक ५० क्विंटल झाली. लसणाला कमाल भाव १८ हजार रुपये मिळाला. हिरव्या मिरचीची एकूण आवक ३४५ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला २ हजार ५०० रुपयांपासून ते ३ हजार ५०० रुपयांपर्यंत कमाल भाव मिळाला.

Vegetable
Pune University Mess Fee Hike: पुणे विद्यापीठातील मेसची १० रुपयांची दरवाढ मागे; विद्यार्थ्यांना दिलासा

शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे - कांदा- एकूण आवक- १,०५० क्विंटल. भाव क्रमांक- १. ४,६७५ रुपये, भाव क्रमांक-२. ३,००० रुपये, भाव क्रमांक-३. १,५०० रुपये. बटाटा- एकूण आवक-‌ २,००० क्विंटल. भाव क्रमांक १. १,५०० रुपये, भाव क्रमांक २.१,००० रुपये, भाव क्रमांक ३.७०० रुपये.

Vegetable
Pune Dry Day Illegal Liquor Sale: ‘ड्राय डे’ला पुण्यात अवैध मद्यविक्रीवर धडक; ६४ गुन्हे, ६२ आरोपी अटकेत

फळभाज्या-एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतीदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात रुपयांत पुढीलप्रमाणे:

टोमॅटो- ४०३ क्विंटल (८०० ते १,६००), कोबी- २२९ क्विंटल (५०० ते १,०००), फ्लॉवर- १०३ क्विंटल (१,२०० ते १,८००), वांगी- ८५ क्विंटल (१,००० ते २,०००), भेंडी- ११६ क्विंटल (१,५०० ते २,५००), दोडका- ५८ क्विंटल (२,००० ते ३,०००), कारली- ७३ क्विंटल (२,००० ते ३,०००), दुधीभोपळा- ४८ क्विंटल (१,००० ते १,८००), काकडी- ७८ क्विंटल (८०० ते २,०००), फरशी- ६४ क्विंटल (२,००० ते ३,०००), वालवड- ६० क्विंटल (१,५०० ते ३,०००), ढोबळी मिरची- ११२ क्विंटल (१,५०० ते २,५००), चवळी- ३४ क्विंटल (२,००० ते ३,०००), शेवगा- ३० क्विंटल (३,००० ते ४,५००), गाजर- ८० क्विंटल (१,५०० ते २,५००), गवार- १८३ क्विंटल (२,००० ते ४,५००), आले- ७२ क्विंटल (८,००० ते १३,०००), वाटाणा- १२५ क्विंटल (४,००० ते ७,०००), भुईमूग शेंगा- ८० क्विंटल (४,५०० ते ५,५००)

Vegetable
Maharashtra Tourism: परदेशी पर्यटकांची महाराष्ट्राला पसंती; पर्यटनातून स्थानिक रोजगाराला मोठी संधी

पालेभाज्या : चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे- मेथी- एकूण १५ हजार ९७० जुड्या (८०० ते १,५०० रुपये), कोथिंबीर- एकूण २९ हजार ४९० जुड्या (३०० ते ७०० रुपये), शेपू- एकूण ६ हजार ३८० जुड्या (३०० ते ६०० रुपये), पालक- एकूण ५ हजार २९० जुड्या (३०० ते ५०० रुपये).

जनावरे : जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ६० जर्सी गायींपैकी ४७ गायींची विक्री झाली. ( १५,००० ते ७०,००० रुपये), ७० बैलांपैकी ५० बैलांची विक्री झाली.(१०,००० ते ४०,००० रुपये). ११० म्हशीं पैकी ८५ म्हशींची विक्री झाली. (३०,००० ते ८०,००० रुपये), ९,१०० शेळ्या- मेंढ्यापैकी ८,८०० शेळ्यांची विक्री झाली असून, त्यांना २,००० रुपयांपासून ते १५,००० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news