Pune Drunk Youth Car Stunt: पुण्यात मद्यधुंद तरुणांचा कारमधून जीवघेणा स्टंट; लॉ कॉलेज रोडवर धिंगाणा, पाच जण ताब्यात

भरधाव कारच्या खिडकीतून शरीर बाहेर काढून बीअरच्या बाटल्या उंचावल्या; डेक्कन पोलिसांची कारवाई, कार जप्त
Drink And Drive
Drink And DrivePudhari
Published on
Updated on

पुणे: शहरातील उच्चभ्रू आणि वर्दळीच्या लॉ कॉलेज रस्त्यावर मध्यरात्री मद्यधुंद तरुणांनी कारमधून जीवघेणा स्टंट करून धिंगाणा घातला. भरधाव कारच्या मागील खिडक्यांमधून शरीर बाहेर काढत हातात बीअरच्या बाटल्या उंचावत आरडाओरडा करणाऱ्या पाच तरुणांना डेक्कन पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकारामुळे स्वतःसह रस्त्यावरील इतर वाहन चालकांच्या जिवाला धोका निर्माण केल्‍या प्रकरणी गुन्‍हा दाखल केला आहे.

Drink And Drive
Pune Garbage Management Crisis: उरुळी देवाची आंदोलनाचा पुण्याच्या कचरा व्यवस्थापनाला फटका; शहरात ३ ते ४ हजार टन कचरा साचला

याप्रकरणी कारचालक वेदांशू रणजितकुमार मंडल (२३ रा. कोरबा, छत्तीसगड), मनीष संजू परिहार (२४ रा. स्वारगेट, पुणे), रोहन भरत औजी (२३ रा. कॅम्प, पुणे), सिद्धांत रामलू कंदूर (२२, रा. कोंढवा बुद्रुक) आणि रुपेश मनोहर पिल्ले (२३ रा. पद्मावती, पुणे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्‍यांची नावे आहेत.

Drink And Drive
Mahatma Phule Poetry Competition: ‘महात्मा फुले विचार आणि कार्य’ विषयावर दीर्घ काव्य स्पर्धा; कविता पाठवण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर

या पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, मोटार वाहन कायदा आणि महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यावेळी वापरलेली कार जप्‍त केली आहे. दि. १० ऑगस्ट रोजी मध्यरात्री दोन ते अडीचच्या सुमारास डेक्कन पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई तुळशीराम भानुदास शेंडगे आणि पोलिस शिपाई महेर हे लॉ कॉलेज रोड परिसरात गस्तीवर होते.

Drink And Drive
Anti Ragging Committee: महाविद्यालयांतील रॅगिंगविरोधी समित्या कागदावरच? यूजीसीच्या आदेशाला संस्थांकडून केराची टोपली

त्यावेळी लॉ कॉलेजकडून नळस्टॉपच्या दिशेने एक सिल्व्हर रंगाची एलेंट्रा कार भरधाव वेगाने जाताना त्यांच्या निदर्शनास आली. कारच्या मागील दोन्ही खिडक्यांमधून तरुणांनी शरीर बाहेर काढले होते. हातात बीअरच्या बाटल्या उंचावत ते मोठमोठ्याने आरडाओरडा करत असल्‍याचे दिसू आले. त्‍यांच्‍या या हुल्‍लडबाजीनंतर पोलिसांनी कारचा पाठलाग सुरू केला. पोलिसांची चाहूल लागताच कारचालकाने नळस्टॉपच्या दिशेने कार आणखी वेगाने पळवली.

Drink And Drive
Pune Traffic Jam: भाजपच्या तिरंगा रॅलीने मध्य पुणे ठप्प; प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान राखत कारचा क्रमांक टिपून घेतला. त्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे कारचा आणि त्यातील तरुणांचा शोध घेण्यात आला. अखेर पाचही जणांना पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर पाचही तरुणांनी मद्यप्राशन केल्याचे समोर आले. गुन्‍ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नवनाथ कुलाळ करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news