

अविनाश दुधवडे
चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची मोठी आवक झाली. मात्र, भाव स्थिर राहिले. बटाटा व लसणाची आवक व भावही स्थिर राहिले. हिरव्या मिरचीची आवक घटून भाव गडगडले. पालेभाज्यांची भरपूर आवक होऊनही भाव कोसळले. राजगुरुनगर येथील बाजारात काकडी, टोमॅटो, वाटाणा, दोडका, शेवगा व गाजराची उच्चांकी आवक झाली. एकूण उलाढाल 6 कोटी 90 लाख रुपये झाली.
कांद्याची एकूण आवक 12 हजार क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक 3 हजार क्विंटलने वाढली. भाव मात्र स्थिर राहिले. कांद्याचा कमाल भाव 1,400 रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक 1,400 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक स्थिर राहून भावही 1,200 रुपयांवर स्थिरावले. लसणाची एकूण आवक 50 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक स्थिर राहून कमाल भावही 12 हजार रुपयांवर स्थिरावले. हिरव्या मिरचीची एकूण आवक 325 क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला 5 हजार रुपयांपासून 7 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.
शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे:
कांदा - एकूण आवक -12,000 क्विंटल. भाव क्रमांक 1 - 1,400 रुपये, भाव क्रमांक 2 - 1,200 रुपये, भाव क्रमांक 3 - 800. बटाटा ः एकूण आवक - 1,400 क्विंटल. भाव क्रमांक 1 - 1,200 रुपये, भाव क्रमांक 2 - 1,000 रुपये, भाव क्रमांक 3 - 800 रुपये.
फळभाज्या : फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतिदहा किलोसाठी मालाला मिळालेले भाव कंसात रुपयांत पुढीलप्रमाणे:
टोमॅटो - 308 क्विंटल (1,000 ते 1,500), कोबी - 225 क्विंटल (400 ते 600), फ्लॉवर - 187 क्विंटल (1,000 ते 1,500), वांगी - 72 क्विंटल (2,000 ते 3,000), भेंडी - 80 क्विंटल (3,000 ते 4,000), दोडका - 58 क्विंटल (2,500 ते 3,500), कारली - 64 क्विंटल ( 2,500 ते 3,500), दुधीभोपळा - 62 क्विंटल (1,000 ते 2,000), काकडी - 115 क्विंटल (1,000 ते 2,000), फरशी - 50 क्विंटल (2,000 ते 3,000), वालवड - 50 क्विंटल (3,000 ते 5,000), ढोबळी मिरची - 104 क्विंटल (3,000 ते 5,000), चवळी - 38 क्विंटल (2,000 ते 3,000), वाटाणा - 160 क्विंटल (2,500 ते 3,000), शेवगा - 52 क्विंटल (3,000 ते 5,000), गाजर - 75 क्विंटल (1,500 ते 2,000), गवार - 41 क्विंटल (6,000 ते 8,000), आले - 150 क्विंटल (3,500 ते 4,500).
पालेभाज्या : पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे:
मेथी - एकूण 16 हजार 190 जुड्या (600 ते 1,000 रुपये), कोथिंबीर - एकूण 24 हजार 500 जुड्या (500 ते 800 रुपये), शेपू - एकूण 2 हजार 560 जुड्या (500 ते 800 रुपये), पालक - एकूण 2 हजार 490 जुड्या (600 ते 800 रुपये).
जनावरे: जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 55 जर्सी गायींपैकी 37 गायींची विक्री झाली (15,000 ते 70,000 रुपये), 90 बैलांपैकी 65 बैलांची विक्री झाली (10,000 ते 40,000 रु. ), 135 म्हशींपैकी 110 म्हशींची विक्री झाली (30,000 ते 80,000), 11,500 शेळ्या-मेंढ्यापैकी 11,050 शेळ्यांची विक्री झाली असून, त्यांना 2,000 रुपयांपासून ते 15,000 रुपयांपर्यंत भाव मिळाला.