Katraj Dairy: कात्रज दूध संघाकडून शेतकऱ्यांना दरफरकाची रक्कम; 13.5 कोटींचे वाटप पूर्ण

प्रतिलिटर 2 रुपये दरफरकाचा निर्णय; 865 संस्थांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा
Katraj Dairy
Katraj DairyPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून (कात्रज डेअरी) दूध दरफरकापोटी शेतकऱ्यांना प्रतिलिटरला दोन रुपये देण्याचा निर्णय वार्षिक सभेत घेण्यात आला होता आणि पहिल्या टप्प्यात ऑक्टोबर 2025 मध्ये एक रुपयाप्रमाणे रक्कम दिली.

Katraj Dairy
Pune Varanasi Amrit Bharat train: पुणे-वाराणसी ‘अमृत भारत’ रेल्वेला मंजुरी; पुणे-जबलपूर गाडी झाली नियमित

उर्वरित एक रुपयाप्रमाणे 6 कोटी 75 लाख 12 हजार रुपये हे 865 दूध संस्थांच्या शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यांत नुकतेच जमा करण्यात आल्याची माहिती संघाचे अध्यक्ष ॲड. स्वप्निल ढमढेरे यांनी दिली. म्हणजेच, दोन टप्प्यांत मिळून एकूण 13 कोटी 50 लाखांहून अधिक रक्कम देण्यात आली आहे.

Katraj Dairy
Pune Potato Price Crash: पुण्यात बटाट्याचे दर घसरले; प्रचंड आवक पण मागणी घटल्याने शेतकरी चिंतेत

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला देण्यास संघाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्याचबरोबर भविष्यात दूधसंकलनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शीतसाखळी मजबूत करणे, पशुखाद्यांच्या सुविधा वाढविणे, कात्रज बँड अधिक बळकट करणे, नवीन दुग्धजन्य उत्पादनांचा बाजारात विस्तार करणे तसेच महिला व युवा शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे, यावर संघाचा विशेष भर राहणार आहे.

Katraj Dairy
Pune Water Supply Shutdown: पुण्यात 24 तास पाणीपुरवठा बंद; दुरुस्ती कामांमुळे निर्णय

पुणे जिल्ह्यातील ग््राामीण भागातील शेतकऱ्यांचा आधारस्तंभ म्हणून संघाची ओळख अधिक मजबूत होत असून, शेतकरीहिताचे निर्णय आणि ठोस अंमलबजावणीमुळे संघ नव्या विश्वासाने पुढे जात असल्याचे त्यांनी कळविले आहे.

Katraj Dairy
Pune Zoo Summer Plan: उन्हाच्या तडाख्यापासून बचावासाठी पुणे प्राणिसंग्रहालयाचा ‘समर प्लॅन’

बाळासाहेब ढमढेरे, प्रकाश भोईटे यांना श्रद्धांजली अर्पण

कात्रज दूध संघाचे माजी ज्येष्ठ संचालक बाळासाहेब ढमढेरे आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांचे नुकतेच निधन झाले. कात्रज संघाच्या सोमवारी (दि. 20) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ढमढेरे व भोईटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्याची माहिती संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news