

पुणे: महापालिकेच्या सिंहगड रस्त्यावरील ‘कलाग््रााम’ प्रकल्प खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग््रेासच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने विरोध दर्शविला आहे. प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी महापौर मंजूषा नागपुरे आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे.
कलाग््राामचा मूळ सांस्कृतिक उद्देश जपण्यासाठी हा प्रस्ताव मागे घेण्याची आणि जर कुठल्याही खासगी संस्थेला कलाग््रााम चालविण्याची जबाबदारी देणार असाल, तर काही अटी लागू करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपण्यासाठी आणि कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी उभारलेल्या कलाग््रााममध्ये मुक्तांगण रंगमंच, प्रदर्शन दालने, सभागृह आदी सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, अपेक्षित प्रमाणात कार्यक्रम होत नसल्याने महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाने तज्ज्ञ सांस्कृतिक संस्थांकडून कलाग््रााम चालविण्यासाठी प्रस्ताव मागविले आहेत.
या निर्णयावर आक्षेप घेत खासगी संस्थेला जबाबदारी देताना स्पष्ट नियमावली तयार करावी, कलाकारांसाठी प्रवेश कायम ठेवावा तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील जाणकार आणि स्थानिक नागरिकांचा समावेश असलेली सल्लागार समिती स्थापन करावी, कोणताही निर्णय घेताना केवळ आर्थिक गणित न पाहता सांस्कृतिक जबाबदारीचे भान ठेवावे, असे पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
कलाग््रााम चालवायला देण्याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही: कामठे
दरम्यान, महापालिकेच्या नाट्यगृह विभागाचे प्रमुख व्यवस्थापक राजेश कामठे यांनी स्पष्ट केले की, कलाग््रााममध्ये नियमित आणि अधिक कार्यक्रम व्हावेत तसेच कलाकारांना व्यासपीठ मिळावे, यासाठी केवळ सांस्कृतिक तज्ज्ञ संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. कलाग््रााम चालवायला देण्याबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नसून, सर्वांगीण विचार करूनच निर्णय घेतला जाणार आहे. सांस्कृतिक संस्थेला कलाग््रााम चालवायला दिले तरी कलाग््राामवरील नियंत्रण महापालिकेकडेच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.