India Post Parcel Pickup Service: पुणेकरांसाठी खुशखबर! आता घरबसल्या इंडिया पोस्टकडून पार्सल पिक-अपची सुविधा

पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही; घर, कार्यालय किंवा व्यावसायिक ठिकाणावरूनच पार्सल उचलून देशभर पाठविणार इंडिया पोस्ट
India Post
India PostPudhari
Published on
Updated on

पुणे: ग्राहकांना अधिक सुलभ, सोयीस्कर व दर्जेदार टपाल सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने इंडिया पोस्ट, पुणे टपाल विभागामार्फत रिटेल पार्सल पिक-अप सेवा सुरू केली आहे. या सेवेचे उद्घाटन पोस्टमास्तर जनरल पुणे क्षेत्र प्रीती अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला.

India Post
Maharashtra Teachers Protest: ७ व ८ जुलैला राज्यभर शाळाबंद! शिक्षकांच्या आंदोलनाचा सरकारला इशारा

या नव्या सुविधेमुळे किरकोळ ग्राहकांना आता पार्सल पाठविण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये येण्याची आवश्यकता नाही. ग्राहकांच्या विनंतीनुसार टपाल विभागाचे कर्मचारी त्यांच्या घर, कार्यालय अथवा व्यावसायिक आस्थापनातून थेट पार्सल स्वीकारतील, त्याची नोंदणी करून देशातील कोणत्याही ठिकाणी सुरक्षित व विश्वासार्ह पद्धतीने पाठवतील.

India Post
Khed Ganja Seizure: खेड पोलिसांची धडक कारवाई! शिरोलीत ₹3.25 लाखांचा गांजा जप्त; एकाला अटक

यावेळी पोस्टमास्तर जनरल अग्रवाल म्हणाल्या, टपाल विभाग नेहमीच ग्राहककेंद्रित सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. रिटेल पार्सल पिक-अप सेवा ही ग्राहकांच्या दारापर्यंत टपाल सेवा पोहोचविण्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या सुविधेमुळे ग्राहकांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचेल तसेच पार्सल पाठविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि सोयीस्कर होईल.

India Post
Wagholi Water Supply Project: वाघोली पाणी योजनेचा धक्कादायक खुलासा! ३० महिने काम सुरू, पण पाण्याचा कोटाच नाही

बदलत्या काळातील ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन इंडिया पोस्ट सातत्याने आधुनिक आणि नावीन्यपूर्ण सेवा उपलब्ध करून देत आहे, तरी 'पार्सल पिक अप-आपल्या दारी' आले असून, याचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पोस्टल सर्व्हिसेसचे संचालक अभिजित बनसोडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

India Post
Hawker License Transfer Fee: पुण्यात फेरीवाल्यांना मोठा धक्का! परवाना वारस हस्तांतरण शुल्कात थेट वाढ

सुविधेचा लाभ घेण्यासाठी संपर्क क्रमांक

नागरिकांनी सुविधेचा लाभ घेण्यासाठी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका हद्द (पुणे कॅन्टोनमेंट, खडकी कॅन्टोनमेंट, येरवडा, हिंजवडी आयटी पार्क, हडपसर, एनआयबीएम, कोंढवा, भोसरी, मार्केट यार्ड) भागातील नागरिकांनी 8421372317 या क्रमांकावर फोनद्वारे किंवा व्हॉट्सपद्वारे संपर्क साधावा. तसेच पुणे महानगरपालिका हद्द (लक्ष्मी रोड, टिळक रोड, डेक्कन, औंध, धनकवडी, नांदेड सिटी, कोथरूड इत्यादी) भागातील नागरिकांनी 7028007223 या क्रमांकावर फोनद्वारे किंवा व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news