Hawker License Transfer Fee: पुण्यात फेरीवाल्यांना मोठा धक्का! परवाना वारस हस्तांतरण शुल्कात थेट वाढ

महापालिकेचा निर्णय; वारसांना परवाना हस्तांतरणासाठी आता ₹700 ऐवजी ₹1000 शुल्क भरावे लागणार, नवीन नियमांना स्थायी समितीची मंजुरी
Hawkers
HawkersPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे महापालिकेकडील अधिकृत फेरीवाल्यांच्या नोंदणी प्रमाणपत्र अथवा परवान्याचे वारसांना द्यावे लागणारे हस्तांतरण शुल्क आता सातशे रुपयांवरून थेट १ हजार रुपये करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

Hawkers
Pune Medical Assistance Scheme: पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! माजी नगरसेवकांसह कुटुंबीयांनाही वैद्यकीय योजनेचा कायमस्वरूपी लाभ

महापालिकेने १९८९ पूर्वी शहरातील फेरीवाल्यांना स्टॉल, स्थिर हातगाडी आणि बैठा व्यवसायासाठी एकूण ७ हजार ७७९ परवाने दिले होते. यापूर्वी २००५च्या महापालिका ठरावानुसार आई-वडील, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण, नातू, नात तसेच पती-पत्नी अशा रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना परवाना हस्तांतरित करण्याची तरतूद होती. मात्र, २०१४ मध्ये केंद्र सरकारचा पथविक्रेता कायदा लागू झाल्यानंतर त्यातील तरतुदींशी सुसंगत बदल आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Hawkers
Medical Negligence: वाघोलीत धक्कादायक आरोप! डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूतीदरम्यान नवजात बाळाचा मृत्यू

नोंदणीकृत पथविक्रेत्याचा मृत्यू झाल्यास, कायमचे अपंगत्व आल्यास किंवा तो गंभीर आजारी असल्यास त्याचे नोंदणी प्रमाणपत्र किंवा परवाना प्रथम पती किंवा पत्नीच्या, त्यानंतर संबंधित पथविक्रेत्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या नावावर हस्तांतरित करण्यात येईल. ही कार्यवाही पथविक्रेता अधिनियमातील तरतुदींनुसार केली जाईल, असे प्रस्तावात नमूद करण्यात आलेले आहे.

Hawkers
Indapur Crime: इंदापूर नगरपरिषद कार्यालयाबाहेर विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्यावर हल्ला

दरम्यान, वारस हस्तांतरणासाठी आकारण्यात येणारे शुल्क २००५ पासून बदललेले नसल्याने त्यात वाढ करण्याची शिफारस शहर फेरीवाला समितीने केली आहे. त्यानुसार शुल्क सातशे रुपयांवरून १ हजार रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तसेच २४ मार्च २००५ रोजीचा महापालिका ठराव रद्द करून नवीन तरतुदींना मंजुरी देण्याची विनंती प्रशासनाने मुख्य सभेकडे केल्याचे भिमाले यांनी सांगितले.

Hawkers
Maharashtra UDID Card Scheme: राज्यातील ४.९७ लाख दिव्यांग लाभार्थ्यांना आर्थिक मदत; ६० हजारांकडे अद्याप यूडीआयडी कार्ड नाही

१२ हजार पथ विक्रेत्यांचे पुनर्वसन

महापालिकेने शहरातील २३,१९२ पथविक्रेत्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण केले असून, ५२५ फेरीवाला क्षेत्रे घोषित केली आहेत. त्यापैकी १२,१५५ नोंदणीकृत पथविक्रेत्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news