Khed Ganja Seizure: खेड पोलिसांची धडक कारवाई! शिरोलीत ₹3.25 लाखांचा गांजा जप्त; एकाला अटक

शिरोलीतील खोलीवर छापा टाकून 6.652 किलो गांजा जप्त; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक
Ganja
GanjaPudhari
Published on
Updated on

राजगुरुनगर: शिरोली (पवळेवस्ती, ता. खेड) येथील खरपुडी फाटा ते खरपुडी खुर्द रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खोलीतून ३ लाख २५ हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी बाबासाहेब विठ्ठल करे (वय ३३) याला एनडीपीएस कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे.खेड पोलिसांकडून गुरुवारी (दि. २) रात्री आठ वाजता हा छापा टाकण्यात आला.

Ganja
Wagholi Water Supply Project: वाघोली पाणी योजनेचा धक्कादायक खुलासा! ३० महिने काम सुरू, पण पाण्याचा कोटाच नाही

खेड पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार संदीप निवृत्ती शिंदे यांच्या मालकीच्या खोलीत आरोपी बाबासाहेब करे राहत होता. त्या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी गांजाचे वेगवेगळ्या स्वरूपातील साठा जप्त केला.

Ganja
Hawker License Transfer Fee: पुण्यात फेरीवाल्यांना मोठा धक्का! परवाना वारस हस्तांतरण शुल्कात थेट वाढ

जप्त केलेला माल (एकूण वजन ६.६५२ किलो) : २८८ छोट्या पुड्यांमध्ये गांजाचे शेंडे – १.७८० किलो (किंमत ८५,००० रुपये), ओले गांजाचे शेंडे – १.०६० किलो (किंमत ५०,००० रुपये), गांजाचा भुगा – ०.८१२ किलो (किंमत ४०,००० रुपये), सुके गांजाचे शेंडे – ३.००० किलो (किंमत १,५०,००० रुपये), एकूण किंमत : ३,२५,००० रुपये.

आरोपी हा गांजा ओळखीच्या लोकांना विक्रीसाठी अनधिकृतपणे बाळगला होता, अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news