Pune Market Yard Vegetable Rates: पुणे मार्केट यार्डात काकडीचे भाव दुप्पट; टोमॅटोची आवक वाढल्याने दर घसरले

शेतकऱ्यांनी तोड कमी केल्याने काकडीची आवक घटली; टोमॅटो १५ हजार क्रेटवर, कोथिंबिरीच्या भावातही घसरण
Tomatoes
TomatoesPudhari
Published on
Updated on

शंकर कवडे

पुणे: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात मागील आठवड्यात काकडीचे दर घसरल्याने शेतकऱ्यांनी तोड कमी केली. त्यामुळे रविवारी आवक कमी राहिली. मात्र, मागणी वाढल्याने काकडीचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत दुपटीने वाढले. टोमॅटोला चांगला भाव मिळाल्याने सात ते आठ हजार क्रेट्‌स होणारी आवक १४ ते १५ हजार क्रेटवर पोहोचली.

Tomatoes
Pune Fruit Market Rates: पुणे फळबाजारात लिंबाचा भाव वधारला; पपई महागली, कलिंगड-खरबूज स्वस्त

आवक वाढल्याने टोमॅटोचे भाव दहा टक्क्यांनी घसरले. ढोबळी मिरची आणि पावट्याची आवक वाढल्याने त्यांचेही भाव कमी झाले आहेत. तसेच कर्नाटकपाठोपाठ गुजरातमधून भुईमूग शेंगाची आवक सुरू झाल्याने त्यांच्या दरातही घसरण झाल्याचे सांगण्यात आले.

Tomatoes
Shravan Fasting Items Price: श्रावण सुरू होण्याआधी उपवासाच्या पदार्थांना मागणी; शेंगदाणा, साबुदाणा आणि गूळ महागला

पावसाने उघडीप दिल्याने तरकारी विभागात रविवारी फळभाज्यांची आवक गत आठवड्याच्या तुलनेत दहा ट्रकने वाढली. रविवारी १०० ट्रकमधून शेतमाल विक्रीसाठी दाखल झाला होता. परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक येथून हिरवी मिरची १४ ते १५ टेम्पो, कर्नाटक येथून कोबी ४ ते ५ टेम्पो, हिमाचल प्रदेश व कर्नाटकातून घेवडा २ टेम्पो, गुजरात आणि कर्नाटकातून भुईमूग शेंग ३ टेम्पो, इंदूर येथून गाजर १० ते १२ टेम्पो, आंध्र प्रदेश व तमिळनाडू येथून तोतापुरी कैरी १ टेम्पो, कर्नाटक येथून पावटा ३ ते ४ टेम्पो, आंध्र प्रदेश व तामिळनाडू येथून शेवगा ४ ते ५ टेम्पो, कर्नाटक येथून मटार २ टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे ८ ते १० टेम्पो, इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून मिळून बटाटा ५५ ते ६० टेम्पो इतकी आवक झाली.

Tomatoes
Chakan Market Vegetable Rates: चाकण बाजार समितीत भाजीपाल्याची आवक वाढली; पालेभाज्यांचे भाव घसरले, उलाढाल ५.९० कोटींवर

स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे ४०० ते ४५० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ३ ते ४ टेम्पो, टोमॅटो १४ ते १५ हजार क्रेट्स, हिरवी मिरची ५ ते ६ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, गाजर २ ते ३ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, मटार २ ते ३ टेम्पो, घेवडा आणि पावटा प्रत्येकी २ ते ३ टेम्पो, शेवगा २ टेम्पो तर कांद्याची ८० टेम्पोमधून आवक होत आहे.

Tomatoes
Pune Fish Chicken Rates: पुण्यात मांसाहाराला ब्रेक; चिकन-अंड्यांचे दर घसरले, मासळी मात्र तेजीत

बहुतांश पालेभाज्यांचे भाव स्थिर; कोथिंबीर स्वस्त

रविवारी (दि. ९) मार्केट यार्डात कोथिंबिरीच्या सुमारे दोन लाख, तर मेथीच्या एक लाख जुड्यांची आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीर आणि मेथीची आवक प्रत्येकी सुमारे ५० हजार जुड्यांनी घटली. बाजारात मागणी वाढल्याने पालक, मुळा आणि करडईच्या भावात जुडीमागे एक ते दोन रुपये वाढ झाली, तर कोथिंबिरीच्या भावात घट नोंदविण्यात आली. अन्य पालेभाज्यांचे भाव मात्र स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news