Pune Fruit Market Rates: पुणे फळबाजारात लिंबाचा भाव वधारला; पपई महागली, कलिंगड-खरबूज स्वस्त

आवक कमी असल्याने लिंबाच्या गोणीमागे १०० रुपयांची वाढ; पपईला मागणी वाढली, कलिंगड-खरबुजाच्या दरात किलोमागे ५ रुपयांची घसरण
Lemon
LemonPudhari
Published on
Updated on

पुणे: आखाडाच्या पार्श्वभूमीवर घरगुती ग्राहकांसह हॉटेल व्यावसायिकांकडून लिंबाला मागणी कायम आहे. त्यातुलनेत आवक कमी पडल्याने लिंबाच्या १५ किलोच्या गोणीमागे शंभर रुपयांनी वाढ झाली. रविवारी बाजारात लिंबाच्या गोणीला ३०० ते १००० रुपये भाव मिळाला. किरकोळ बाजारात आकारानुसार दहा रुपयांना दोन ते तीन नग अशी विक्री सुरू आहे.

Lemon
Chakan Market Vegetable Rates: चाकण बाजार समितीत भाजीपाल्याची आवक वाढली; पालेभाज्यांचे भाव घसरले, उलाढाल ५.९० कोटींवर

पावसाच्या आगमनानंतर बाजारात कलिंगड, खरबुजाला घटलेली मागणी कायम आहे. मात्र, त्यातुलनेत आवक जास्त असल्याने त्यांच्या भावात किलोमागे पाच रुपयांची घसरण झाली आहे. उन्हाच्या तीव्र चटक्यामुळे फुलांची गळ होऊन उत्पादन घटल्याने फळबाजारात पपईची आवक कमीच आहे. त्यापेक्षा मागणी जास्त असल्याने पपईच्या भावात किलोमागे पाच रुपयांनी वाढ झाली आहे. उर्वरित सर्व फळांची आवक जावक कायम असल्याने गत आठवड्यातील दर टिकून आहेत.

Lemon
Pune Fish Chicken Rates: पुण्यात मांसाहाराला ब्रेक; चिकन-अंड्यांचे दर घसरले, मासळी मात्र तेजीत

फळबाजारात रविवारी (दि. ९) लिंबू १००० ते १२०० गोणी, मोसंबी ५० ते ६० टन, संत्रा २ टन, डाळींब १०० टन, पपई ५ ते ६ टेम्पो, कलिंगड २० ते २५ गाड्या, खरबूज ५ ते ६ टेम्पो, चिक्कू ५०० डाग, पेरु ४०० ते ५०० क्रेट, पिअर ५ गाड्या, सीताफळ १० ते १२ टन आणि अननसाची ५ ट्रक इतकी आवक झाली होती.

Lemon
Shravan Fasting Items Price: श्रावण सुरू होण्याआधी उपवासाच्या पदार्थांना मागणी; शेंगदाणा, साबुदाणा आणि गूळ महागला

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ३०० ते १०००, मोसंबी : (३ डझन) : १३०-२५० (४ डझन) : ३५-९०, संत्रा : (१० किलो) : १५०-१०००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ५०-१३०, आरक्ता : १०-४०, गणेश : ५-२०, कलिंगड : ५-७, खरबूज : १०-२०, पपई : १०-४०, चिक्कू (दहा किलो) : १००-६००, पेरू (२० किलो) : ३००-५००, अननस (१ डझन) : १००-६००, सीताफळ (१ किलो) : २०-१५०, पिअर (२४ ते २५ किलो) : ३५००-४०००.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news