Pune illegal flex action: अनधिकृत फ्लेक्स, बॅनर काढण्यासाठी अधिकारी रस्त्यावर!

विद्रूपीकरण कमी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त रस्त्यावर : दररोज पाच गुन्हे दाखल करण्याचे दिले आदेश
Pune illegal flex action
अनधिकृत फ्लेक्स, बॅनर काढण्यासाठी अधिकारी रस्त्यावर!File Photo
Published on
Updated on

पुणे : ‌‘शहराच्या विद्रूपीकरणाला कारणीभूत ठरणाऱ्या अनधिकृत फ्लेक्सबाजीवर आता पुणे महापालिकेने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना आदेश दिले आहेत की, दररोज किमान पाच गुन्हे अनधिकृत फ्लेक्सविरोधात दाखल करावेत तसेच फ्लेक्सचे सांगाडे तुकडे करून जप्त करण्याचे आदेश दिले आहेत,‌’ अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.(Latest Pune News)

Pune illegal flex action
Pune water cut: गुरुवारी पुण्यात काही भागांत पाणीपुरवठा बंद

शहरात सध्या वाढदिवस, सण, स्वागत, निवड किंवा नियुक्तीच्या शुभेच्छा देण्यासाठी उभारले जाणारे फ्लेक्स, विद्युत खांब, सिग्नल, दुभाजक आणि सार्वजनिक स्थळांवर धोकादायक पद्धतीने लावले जात आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात फ्लेक्सबाजीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.

Pune illegal flex action
Gautami Patil accident: गौतमी पाटीलला क्लीन चिट

आकाशचिन्ह आणि अतिक्रमण विभागांकडून कारवाई केली जात असली, तरी राजकीय फ्लेक्सला मिळणारे ‌‘अभय‌’ हे प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे, त्यामुळे हे फ्लेक्स व बॅनर काढण्यासाठी व या कारवाईवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी तीनही अतिरिक्त आयुक्तांना परिमंडळांची जबाबदारी विभागून देण्यात आली आहे. यामुळे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कारवाईची पाहणी करणार आहेत, असे पृथ्वीराज बी. पी. म्हणाले.

Pune illegal flex action
Pune Crime: पुण्यात काय चाललंय? पोलिस कर्मचार्‍यावरच कोयत्याने वार, आरोपी अजूनही मोकाट

फ्लेक्स प्रिंटिंग करणाऱ्या व्यावसायिकांची बैठक

फ्लेक्स प्रिंटिंग करणाऱ्या व्यावसायिकांची बैठक घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या बैठकीत प्रत्येक फ्लेक्सवर प्रिंटरचे नाव व पत्ता अनिवार्य करण्याबाबत चर्चा करण्यात येणार असून, तसा निर्णय घेतला जाणार आहे. अशा उपाययोजनांमुळे अनधिकृत फ्लेक्सबाजीवर नियंत्रण आणण्यास मदत होईल, असा विश्वास देखील अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी व्यक्त केला.

Pune illegal flex action
Pune Local Body Election 2025: जिल्ह्यातील ४ नगरपरिषदा, 3 नगरपंचायतींचे नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव

सर्व सहाय्यक आयुक्तांना दररोज पाच गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या चौकांत कायमस्वरूपी फ्लेक्सचे सांगाडे उभे केलेले आहेत, ते तोडून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मी स्वतः बिबवेवाडी, कसबा आणि भवानी पेठ क्षेत्रांची पाहणी केली असून, इतर अतिरिक्त आयुक्तांनाही परिमंडळातील पाहणीची जबाबदारी दिली आहे.

पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news