

पुणे : पर्वती आणि वारजे जलकेंद्रांमध्ये विद्युत पंपिंग व वितरण यंत्रणेच्या तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे गुरुवारी (दि. 9) पुण्यातील काही भागांत संपूर्ण दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी (दि. 10) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुवठा विभागाने दिली आहे.(Latest Pune News)
देखभाल दुरुस्तींच्या कामांमध्ये नवीन पर्वती जलशुद्धीकरण केंद्र (500 एमएलडी), जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र तसेच पर्वती एमएलआर, एचएलआर, एलएलआर टाक्या परिसर, एसएनडीटी एमएलआर टाकी परिसर, चतु:शृंगी टाकी परिसर, लष्कर जलकेंद्र, होळकर जलकेंद्र, चिखली जलकेंद्र, वारजे फेज क्रमांक 1 व 2 जलकेंद्र आणि संबंधित जीएसआर टाकी परिसर यांचा समावेश आहे. महावितरण विभागाच्या पत्रानुसार वारजे जलकेंद्र येथील
22 केव्ही उच्चदाब बेकर पॅनेलच्या दुरुस्ती व सर्व्हिसिंगचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या सर्व क्षेत्रांमध्ये गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहील. महापालिकेच्या जलपुरवठा विभागाने नागरिकांना याबाबत आगाऊ खबरदारी घेण्याचे आणि पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, शुक्रवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.