Pune Illegal Fiber Cable Action: पुण्यात अनधिकृत फायबर केबलवर धडक कारवाई; दोन ट्रकभर केबल हटवली

सातारा रस्त्यावर मोहीम सुरू; अपघात धोका व महसूल बुडीत थांबवण्यासाठी प्रशासनाचा बडगा
Fiber Cable
Fiber CablePudhari
Published on
Updated on

पुणे: शहरात मोठ्या प्रमाणात पसरलेल्या अनधिकृत ऑप्टिकल फायबर केबलच्या जाळ्यावर अखेर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारत एक एप्रिलपासून धडक मोहीम सुरू केली आहे. सातारा रस्त्यावर गुरुवारी सकाळी महापालिकेच्या विद्युत विभागासह विविध विभागांच्या संयुक्त पथकाने पोलिस बंदोबस्तात कारवाई करीत अनधिकृत केबल हटवण्यास सुरुवात केली. या कारवाईत पहिल्याच दिवशी दोन ट्रकभर केबल काढण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेची तीवता स्पष्ट झाली.

Fiber Cable
Pune EV Charging Station Project: पुण्यात ईव्ही चार्जिंग प्रकल्प फसला; कोट्यवधी खर्चानंतरही प्रतिसाद कमी

शहरातील उड्डाणपूल, रस्त्यांच्या कडेला असलेले वृक्ष, पथदिवे, सिग्नल, बसथांबे, तसेच खासगी व सरकारी इमारतींवरून अनधिकृत केबलचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे. या केबलमुळे अपघातांचा धोका वाढत असून, महापालिकेचा महसूलही बुडत असल्याचे चित्र समोर आले आहे. मागील वर्षी या विरोधात कारवाई सुरू करण्यात आली होती; मात्र काही काळानंतर ती थंडावली होती. अलीकडेच स्थायी समितीच्या बैठकीनंतर या प्रश्नावर पुन्हा लक्ष केंद्रित करीत कारवाईला वेग देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Fiber Cable
Pune Property Tax Revenue: करदाते वाढले तरी पुण्यात मालमत्ता कर महसूल 300 कोटींनी घट

त्या अनुषंगाने एक एप्रिलपासून नियमित कारवाई सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार बुधवारी सकाळी साडेदहा वाजल्यापासून सातारा रस्त्यावरील आदिनाथ सोसायटीसमोर कारवाईला सुरुवात करण्यात आली. या मोहिमेत स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, विद्युत विभागाच्या प्रमुख मनीषा शेकटकर, अतिक्रमण विभागाचे प्रमुख सोमनाथ बनकर, अग्निशामक दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे, तसेच कार्यकारी अभियंता नीलेश कालेकर आदी उपस्थित होते.

Fiber Cable
Pune Ola Uber Fare Issue: ओला-उबेर दरांवरून वाद; पुण्यात रिक्षाचालकांची RTA बैठकीची मागणी

आदिनाथ सोसायटी, पुष्प मंगल कार्यालय परिसर, उत्सव इमारत, राजर्षी शाहू महाराज सोसायटी, पुण्याई नगर आणि धनकवडी परिसरात ही कारवाई राबविण्यात आली. अनधिकृत केबलमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होतो आणि महापालिकेचा महसूलही बुडतो, याकडे लक्ष वेधत संपूर्ण शहरात ही मोहीम अधिक वेगाने राबवली जाईल, असे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

Fiber Cable
Pune Water Supply Builder Responsibility: समाविष्ट गावांतील पाणीपुरवठा बिल्डरचीच जबाबदारी; महापालिकेचे स्पष्ट आदेश

अनधिकृत केबल हटवण्याची कारवाई सुरू असली, तरी यासाठी ठोस धोरण आवश्यक असून, पुढील बैठकीत ते सादर केले जाईल. विद्युत विभागाच्या प्रमुख मनीषा शेकटकर यांनीही मागील वर्षापासून सुरू असलेली कारवाई आता नियमितपणे राबवली जाणार असल्याचे स्पष्ट करीत पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात केबल काढण्यात आल्या.

नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news