Pune Methanol Liquor Accused: विषारी दारूकांडातील मुख्य आरोपीची धक्कादायक ओळख; योगेश व्हानकडेच ‘सिकंदर राठोड’ बनून चालवत होता अवैध साम्राज्य

चार गुन्हे दाखल असूनही हातभट्टी दारूचा व्यवसाय सुरूच; तीन वर्षांपासून पुरवठा साखळीत सक्रिय असल्याचा तपासात खुलासा
Accused
AccusedPudhari
Published on
Updated on

पुणे: मिथेनॉलमिश्रित विषारी दारूप्रकरणातील मुख्य आरोपी योगेश राजेंद्र व्हानकडे याच्याबाबत अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. अवैध दारूच्या व्यवसायात आपली खरी ओळख लपवून ठेवण्यासाठी त्याने ‌‘सिकंदर राठोड‌’ हे नाव धारण केल्याचे तपासात समोर आले. पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईपासून वाचण्यासाठी तसेच व्यवहार करताना संशय येऊ नये म्हणून तो हे नाव वापरत असल्याची माहिती समोर आली. ही विषारी दारू प्यायल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात 17 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे.

Accused
Pune Methanol Liquor Case: विषारी दारूकांडानंतर मोठी कारवाई; 645 लिटर गावठी दारू जप्त, उत्पादन शुल्क विभागातील 13 जण निलंबित

योगेश राजेंद्र व्हानकडे (वय 23) हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील बेलाटी लमाण तांडा येथील रहिवासी आहे. रोजगारानिमित्त तो काही वर्षांपूर्वी पुण्यात आला. सुरुवातीला कुंजीरवाडी, घोरपडी आणि इतर भागांत वास्तव्यास असलेला व्हानकडे गेल्या पाच महिन्यांपासून मुंढवा येथील केशवनगर परिसरातील गुरुकृपा सोसायटीत आई-वडिलांसह राहत होता. वरकरणी सामान्य तरुण म्हणून वावरणारा योगेश प्रत्यक्षात अवैध दारूच्या पुरवठा साखळीतील महत्त्वाचा दुवा बनल्याचे तपासात समोर आले आहे.

Accused
Pune Illegal Liquor Sale: पुण्यात विषारी दारूकांडानंतरही अवैध दारूविक्री सुरू; 19 मृत्यूंनंतरही धंदा बिनधास्त

तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीतून मागील तीन वर्षांपासून तो हातभट्टी दारूच्या व्यवसायात सक्रिय असल्याचे उघड झाले. उरुळी कांचन परिसरातील राजू प्रजापती उर्फ राधेश्याम गोयल याच्याकडून तो मोठ्या प्रमाणावर हातभट्टीची दारू खरेदी करीत होता. 35 लिटर क्षमतेचा एक कॅन तो 1,700 ते 1,800 रुपयांना विकत घेत असे. त्यानंतर ही दारू पुणे शहर तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध भागांमध्ये पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे.

Accused
Uruli Kanchan Poisonous Liquor Death: उरुळी कांचनमध्ये विषारी दारूमुळे मृत्यू? 22 बळींनंतर रॅकेटचे कनेक्शन उघड

विषारी दारूकांडानंतर पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या संपूर्ण रॅकेटचा तपास सुरू आहे. हातभट्टीची दारू तयार करणारे, तिची वाहतूक करणारे, साठवणूक करणारे आणि किरकोळ विक्री करणारे अशा सर्व स्तरांवरील संबंधितांची चौकशी केली जात आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता असून, अवैध दारू व्यवसायाचे विस्तृत जाळे उघड होण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Accused
Shirur Illegal Liquor System: शिरूरमध्ये गावठी दारूवर कारवाईचा दिखावा? यंत्रणेतील त्रुटींमुळे आरोपी सुटत असल्याचा आरोप

गुन्हे दाखल असले तरी व्यवसाय सुरूच ठेवला

व्हानकडेविरुद्ध 2022 पासून मुंढवा आणि हडपसर पोलिस ठाणे, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वीही त्याच्यावर अवैध दारूची वाहतूक, साठवणूक आणि विक्रीप्रकरणी कारवाई केली होती. मात्र, त्यानंतरही त्याने हा व्यवसाय सुरूच ठेवला होता. वारंवार कारवाई होऊनही त्याच्याविरोधात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना केली नसल्याचेही आता समोर येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news