Uruli Kanchan Poisonous Liquor Death: उरुळी कांचनमध्ये विषारी दारूमुळे मृत्यू? 22 बळींनंतर रॅकेटचे कनेक्शन उघड

पांढरस्थळ येथील मृत्यूनंतर परिसरात खळबळ; मिथेनॉलमिश्रित दारू पुरवठ्याचा संशय तीव्र
Death
DeathPudhari
Published on
Updated on

उरुळीकांचन: पुणे व पिंपरी चिंचवड शहरात विषारी दारुने २२ जणांचा बळी गेल्यानंतर उरुळीकांचन येथील दारुभट्टीतून उत्पादीत होऊन विक्रीसाठी गुत्यावर गेलेल्या विषारी दारुने उरुळी कांचन येथील एकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

Death
Shirur Illegal Liquor System: शिरूरमध्ये गावठी दारूवर कारवाईचा दिखावा? यंत्रणेतील त्रुटींमुळे आरोपी सुटत असल्याचा आरोप

विषारी दारुने मृत्यूमुखी पडलेला तरुण एका खासगी दवाखान्यात शुक्रवारी( दि.२९) सकाळपासून उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती उजेडात आली असून खासगी रुग्णालयात सूत्रांनी विषारी दारू सेवनाने रुग्णाचा मृत्यू झाल्याची पुष्टी दिली आहे. विषारी दारु पुरवठ्याचे भेसळाचे उगमस्थान उरुळीकांचन येथून घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Death
Hadapsar Illegal Liquor Deaths: हडपसरमध्ये विषारी दारूचा अड्डा उघड; 6 मृत्यूनंतर पोलिसांवर गंभीर आरोप

पुणे व पिंपरी चिंचवड शहरात विषारी हातभट्टी दारुसेवणाने २२ जणांचा मृत्यूचा आकडा गाठल्यानंतर शहरात मुख्य दारू पुरठ्याचा स्त्रोत असलेल्या उरुळीकांचन येथेच एका तरुणाचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राजू उमेश अवचरे (वय -३८,रा.पांढरस्थळ , उरुळीकांचन) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

Death
Illegal Liquor Network: उरुळी कांचनमध्ये विषारी दारूचे जाळे? 50 वर्षांपासून अवैध धंद्याचे आरोप

तो तरुण शुक्रवारी सकाळपासून उलट्या, पोटदुखी , मळमळ व स्मृतीभंश आदी लक्षणे आढळून खासगी दवाखान्यात दाखल झाला होता. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरात घडलेल्या विषारी दारुच्या घडलेल्या हत्याकांडात उरुळीकांचन शहरातून पुरवठा होणाऱ्या हातभट्टी दारुचा पुरवठा असल्याचा संक्षय व्यक्त होत होता. आता स्थानिक गुत्यावर तरुणाचा मृत्यू झाल्याने हे भेसळकांड उरुळीकांचन येथू नच घडले असल्याचा दाट संशय आहे.

Death
Pune Poisonous Liquor Deaths: पुणे हादरले! फुगेवाडीत विषारी दारूमुळे 13 मृत्यू; अनेक कुटुंबे उद्ध्वस्त

कारण उरुळीकांचन येथूनच पुणे व पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात दारुचा अनेक वर्षे पुरवठा आहे. या ठिकाणाहूनच स्पिरीट व मिथेनाॅल सारखा पदार्थ दारुत मिसळला का अशी शंका उपस्थित होत आहे. दरम्यान ही घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून दक्षता घेण्यात आल्याची चर्चा असून या रॅकेट चालविणाऱ्या मुख्य ठिकाणी प्रशासन कारवाई करणार का, म्हणून विचारणा होऊ लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news