Pune Hill Fruits Market Price: पुणे फळबाजारात पहाडी फळांची बहर; चेरी, पिच, प्लमला मोठी मागणी

जम्मू-काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमधून आलेल्या ताज्या पहाडी फळांनी मार्केट यार्ड सजले असून दर चढे असले तरी ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे
Hill Fruits Market
Hill Fruits MarketPudhari
Published on
Updated on

शंकर कवडे

पुणे: पावसाळ्याच्या उंबरठ्यावर पुण्याच्या फळबाजारात सध्या पहाडी फळांची रंगत पाहायला मिळत आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या डोंगर रांगांतून आलेल्या लालचुटूक चेरी, रसाळ पिच, गोडसर प्लमने बाजार सजला असून, पुणेकरांकडून या फळांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असलेल्या या फळांचे दर चढे असले तरी ग्राहकांची खरेदी मात्र कमी झालेली नाही.

Hill Fruits Market
Pune Cultural Policy Committee 2026: पुण्यासाठी स्वतंत्र सांस्कृतिक धोरण; उच्चस्तरीय समिती स्थापन

मार्केट यार्डातील फळ विभागात सध्या चेरी, प्लम, जर्दाळूसह इतर फळांची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. रंग, चव आणि पौष्टिकतेमुळे ही फळे ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. विशेषतः चेरी आणि पिच खरेदीसाठी ग्राहकांची मागणी वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि काश्मीरमधील या फळांचा हंगाम बहरात येतो.

Hill Fruits Market
Pune Municipal School Privatization: पुणे महापालिकेच्या शाळा खासगी संस्थेकडे देण्याचा वाद; प्रस्ताव मंजूर

त्यामुळे सध्या बाजारात विविध प्रकारच्या पहाडी फळांची रेलचेल दिसून येत आहे. पुढील महिनाभर पिच, प्लमसह अन्य पहाडी फळांची आवक कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, हिमाचल चेरीचा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात पोहोचला असून, आत्ता काश्मिरी चेरी उपलब्ध राहणार आहे. हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमधून ही फळे थेट वाहनांद्वारे तसेच विमानमार्गे पुण्यात दाखल होत आहेत. त्यामुळे ग्राहकांना ताजी आणि दर्जेदार फळे मिळत असल्याची माहिती फळ व्यापारी सत्यजित झेंडे यांनी दिली.

Hill Fruits Market
Pune 23 Villages Development Plan: पुणे महापालिकेच्या २३ गावांसाठी विकास आराखड्यास मंजुरी

हिमाचलच्या पिअरची प्रतीक्षा

हिमाचल प्रदेशातील पिअरचा हंगामही सुरू झाला आहे. मात्र, बाजारात अद्याप आवक सुरू झाली नाही. गुरुवारी (दि. १८) किन्नूर, नारकांडा आदी भागातून पिअर बाजारात दाखल होईल. यंदा लहरी हवामानाचा फटका हिमाचलमधील फळांच्या उत्पादनाला बसला आहे. त्यामध्ये, पर्यटकांकडून मागणी राहिल्याने येथील फळे कमी प्रमाणातच बाजारात येत असल्याचे निरीक्षण व्यापारी सुयोग झेंडे यांनी नोंदविले.

Hill Fruits Market
Someshwarnagar Nira Dam Water Leakage: सोमेश्वरनगरमध्ये बंधाऱ्यांतून पाणीगळती; शेतकऱ्यांचे संकट वाढले

काश्मीर चेरी

  • प्रमुख जिल्हे... शोपियान, गांधरबल, सोपोर, बडगाम

  • आवक......... २००० ते २५०० बॉक्स (१ किलो)

  • घाऊक दर..... ३५० ते ५०० रुपये प्रतिकिलो

  • किरकोळ दर... ४५० ते ६०० रुपये प्रतिकिलो

पिच

  • प्रमुख जिल्हे... नैनीताल, राजगड

  • आवक......... ४०० बॉक्स (७ ते १० किलो)

  • घाऊक दर..... ११०० ते १३०० रुपये

  • किरकोळ दर... २०० ते २५० रुपये प्रतिकिलो

प्लम

  • प्रमुख जिल्हे... कुलुमंडी, मनाली, सोपोर, बारामुल्ला, सोपियान, अनंतनाग

  • आवक......... १२०० ते १५०० बॉक्स (२ ते ५ किलो)

  • घाऊक दर..... ४०० ते ६०० रुपये (४ ते ५ किलो)

  • किरकोळ दर... ३०० ते ३५० रुपये प्रतिकिलो

जर्दाळू

  • प्रमुख जिल्हे... शोपियाना, गांधरबल, किन्नोर

  • आवक......... ४०० ते ५०० बॉक्स (२ ते ४ किलो)

  • घाऊक दर..... ३५० ते ५०० रुपये

  • किरकोळ दर... २०० रुपये प्रतिकिलो

नासपती

  • प्रमुख जिल्हे : अमृतसर, लुधियाना (पंजाब), सहारंगपूर, बिजनौर (उत्तर प्रदेश)

  • आवक.......................२०० ते २५० बॉक्स (८ ते १० किलो)

  • घाऊक दर...............४०० ते ५०० रुपये

  • किरकोळ दर...............१०० ते १२० रुपये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news