Pune 23 Villages Development Plan: पुणे महापालिकेच्या २३ गावांसाठी विकास आराखड्यास मंजुरी

शहर सुधारणा समितीने २३ नव्याने समाविष्ट गावांचा शास्त्रोक्त आणि नियोजनबद्ध विकास करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्यास एकमताने मान्यता दिली आहे
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पुणे: महानगरपालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत शहराच्या भविष्यातील विकास आणि नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांसाठी विकास आराखडा (डीपी) तयार करण्याच्या प्रक्रियेला अधिकृत सुरुवात होणार आहे.

Pune Municipal Corporation
Someshwarnagar Nira Dam Water Leakage: सोमेश्वरनगरमध्ये बंधाऱ्यांतून पाणीगळती; शेतकऱ्यांचे संकट वाढले

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ मधील तरतुदींनुसार विकास आराखडा तयार करण्याचा इरादा जाहीर करण्यास समितीने मान्यता दिली. त्याचबरोबर या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या नगररचना अधिकाऱ्याच्या नियुक्तीलाही हिरवा कंदील देण्यात आला आहे.

Pune Municipal Corporation
Pune District Police Transfer List: पुणे जिल्ह्यात ७४ सहाय्यक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या जाहीर

त्यानुसार शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांची नगररचना अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे नव्याने समाविष्ट गावांचा संतुलित, शाश्वत आणि नियोजनबद्ध विकास करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया अधिक वेगाने राबविणे शक्य होणार आहे.

Pune Municipal Corporation
Gutkha Smuggling Network: गुटखा तस्करीचे मोठे सिंडिकेट उघड; भ्रष्ट यंत्रणा आणि ‘बडे आका’चे संगनमत समोर

भविष्यातील लोकसंख्यावाढ, नागरिकांच्या गरजा, रस्ते, सार्वजनिक सुविधा, पायाभूत सेवा आणि हरित क्षेत्रांचा विचार करून विकास आराखडा तयार केला जाणार आहे. त्यामुळे या भागांच्या सर्वांगीण विकासासाठी भक्कम पाया निर्माण होणार आहे.

Pune Municipal Corporation
Shivare Land Acquisition Protest: शिवरेत भूसंपादनावरून ग्रामस्थ आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षा स्मिता वस्ते म्हणाल्या, “पुण्याच्या सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकासासाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांचा विकास शास्त्रोक्त, नागरिकाभिमुख आणि दूरदृष्टी ठेवून व्हावा, यासाठी विकास आराखडा आवश्यक होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news