

पुणे: मान्यवरांना तिकिट नाकारणे, एकाच जागेसाठी दोन माजी नगरसेवक अडून बसणे, त्यासाठी दुसऱ्या पक्षाचा झेंडा हाती घेऊन रिंगणात उतरणे आदी कारणांमुळे शहरातील अनेक प्रभागातील लढती लक्षवेधी ठरल्या आहेत. या हाय-व्होल्टेज लढतींकडे शहरातील राजकीय जाणकारांबरोबर सर्वसामान्य पुणेकरांचेही लक्ष लागून राहिले आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशीच या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट, दोन्ही राष्ट्रवादी, काँग््रेास-शिवसेना (उबाठा), मनसे या पक्षात या लढती होत असून या पक्षातील अनेक मात्तबरांनी परस्परांविरुद्ध शड्डू ठोकले आहेत. प्रभाग 23 मध्ये भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर आणि त्यांचे कट्टर विरोधक व शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांचे पुत्र प्रणव धंगेकर यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले जऱ्हाड, अमोल बालवडकर, किरण बारटक्के, धनंजय जाधव तसेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले सचिन दोडके, सायली वांजळे, दिलीप बराटे व त्यांचा पुतण्या भारतभूषण बराटे आदींच्या लढतींबाबतही विशेष उत्सुकता आहे.
प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपचे योगेश मुळीक व राष्ट्रवादीचे संदीप जऱ्हाड एकमेकांविरोधात उभे आहेत. प्रभाग 7 मध्ये माजी आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग््रेासचे माजी स्थायी समिती अध्यक्ष नीलेश निकम निवडणूक रिंगणात उभे आहेत. प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपचे सनी निम्हण यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे प्रकाश ढोरे यांची लढत लक्षवेधी ठरणार आहे. भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर सर्वाधिक चर्चेत आलेले अमोल बालवडकर हे राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात प्रभाग 9 मध्ये भाजपचे लहू बालवडकर आहेत. या लढतीकडे जाणकारांचे विशेष लक्ष आहे. याच प्रभागातून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे आणि भाजपचे गणेश कळमकर यांची लढत देखील लक्षवेधी ठरणार आहे.
प्रभाग 10 मध्ये कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे राष्ट्रवादी काँग््रेासच्या तिकिटावर लढत आहे. तिच्याविरोधात भाजपच्या रूपाली पवार आहेत. तर, याच प्रभागातून भाजपचे दिलीप वेडे-पाटील राष्ट्रवादीच्या शंकर केमसे यांच्याविरोधात उभे आहेत. राष्ट्रवादी काँग््रेासचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे चिरंजीव हर्षवर्धन मानकर प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणूक लढवत आहे. त्यांच्याविरोधात भाजपचे अजय मारणे उभे आहेत. भाजपच्या निवेदिता एकबोटे पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. प्रभाग 12 मध्ये त्यांच्याविरोधात स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दीपक (बाळासाहेब) बोडके हे रिंगणात आहेत. प्रभाग 21 मध्ये भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्य श्रीनाथ भिमाले निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर काँग््रेासचे नवखे उमेदवार अक्षय जैन निवडणूक लढवत आहे.
प्रभाग 24 मधून सदानंद शेट्टी यांच्या पत्नी सुजाता यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात भाजपच्या उज्ज्वला यादव रिंगणात आहेत. प्रभाग 25 मधून राष्ट्रवादी काँग््रेासच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे-पाटील आणि भाजपच्या स्वप्नाली नितीन पंडित यांची लढत लक्षवेधी ठरणार आहे. याच प्रभागातून भाजपकडून राघवेंद्र मानकर, भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट निवडणूक रिंगणात आहेत. तसेच, दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग 26 मधून भाजपचे अजय खेडकर आणि राष्ट्रबादीचे विजय ढेरे एकमेकांविरोधात उभे आहेत. प्रभाग 27 मधून भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे निवडणुक लढवत असून त्यांना शिवसेनेतून (उबाठा) राष्ट्रवादी दाखल झालेल्या अशोक हरणावळ लढत देत आहेत. याच प्रभागातून राष्ट्रवादीकडून धनंजय जाधव विरोधात भाजपचे अमर आवळे सामना रंगणार आहे. प्रभाग 36 मधून भाजपचे महेश वाबळे यांच्याविरोधात कांग््रेासमधून शिवसेनेत गेलेले माजी नगरसेवक आबा बागूल निवडणूक लढवत आहेत. कोथरूडमध्ये (प्रभाग 31) शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेल्या पृथ्वीराज सुतार यांना मनसेचे किशोर शिंदे यांच्याशी लढावे लागणार आहे.