Quantum Communication Technology: आर्थिक व्यवहार होणार 'झट पट पटापट', आयुकाच्या संशोधनामुळे स्वदेशी क्रांती

बिनशर्त सुरक्षित डेटा व आर्थिक व्यवहारांसाठी नवे तंत्रज्ञान; आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये संशोधन प्रकाशित
Communication Technology
Communication TechnologyPudhari
Published on
Updated on

आशिष देशमुख

सध्या आपला बहुतेक संवाद हाऑप्टिकल फायबरद्वारे होतो. परंतु असे संवाद काही विशिष्ट गृहितकांवर आधारित सुरक्षित असतात. सुरक्षित क्वांटम संवादाकडे वळून अशी गृहितके टाळता येतात. परंतु त्यामध्ये अनेक आव्हाने आहेत. फेज स्थिरीकरणाशी संबंधित एक प्रमुख समस्या ‌‘आयुका‌’च्या संशोधकांनी ‌‘फोटॉनसिंक‌’ नावाची एक नवीन स्वदेशी प्रणाली विकसित करून दूर केली आहे. ज्यामुळे लांब अंतरावरील डेटाचे बिनशर्त सुरक्षित प्रसारण करणे शक्य होईल. प्रामुख्याने आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित होतील, असा दावा संशोधकांनी केला आहे.

Communication Technology
Ajit Pawar Free Metro Bus: ‘रिकाम्या तिजोरीत आणे आणू’; मोफत मेट्रो-बसवर अजित पवारांचा ठाम दावा

पुणे येथील आयुका (आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र केंद्र) आणि नोएडा येथील जेआयआयटी (जयपी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) च्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन संयुक्तपणे केले आहे. पुणे आयुकातील शास्त्रज्ञ प्रा. डॉ. सुभदीप डे, डॉ. स्टॅनली जॉन्सन आणि जेआयआयटीचे डॉ. संदीप मिश्रा आणि प्रा. डॉ. अनिर्बन पाठक यांचे हे संशोधन ‌‘नेचर पोर्टफोलिओ‌’ जर्नल ‌‘फिजिक्स कम्युनिकेशन्स‌’मध्ये प्रकाशित झाले आहे.

Communication Technology
Devendra Fadnavis Pune speech: ‘खिशात नाही दाणा, बाजीराव म्हणा’; पुण्यात फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

नेमके तंत्रज्ञान अन्‌‍ फायदा कसा होणार ?

  • या तंत्रज्ञानाला ‌‘फोटॉनसिंक‌’ म्हणतात. जे दूरसंचार ऑप्टिकल फायबर वापरते.

  • हे सेन्सर, संगणक आणि संवाद उपकरणांमध्ये क्वांटम नेटवर्क तयार करण्याची क्षमता वाढवते.

  • ऑप्टिकल फायबरवर तापमानातील चढउतार, आवाज, भूकंपाचे कंपन आणि इतर पर्यावरणीय परिणाम होतो.

  • हे अपरिहार्य परिणाम ऑप्टिकल फायबरमधून वाहणाऱ्या प्रकाशाच्या फोटॉनमध्ये अडथळे निर्माण करतात.

  • असे अनेक परिणाम टाळण्यासाठी आणि मोठ्या अंतरापर्यंत वितरित करण्यासाठी हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरणार आहे.

  • मोनोक्रोमॅटिक ऑप्टिकल फोटॉन वितरीत करण्यासाठी फेज-सुसंगत फायबर (पीसीएफ) आवश्यक आहेत.

  • हे अल्ट्रा-स्टेबल पीसीएफ लिंक्स तयार करण्यास सक्षम आहे.

  • तसेच त्याचे हार्डवेअर स्रोत लेझरच्या कमी वारंवारतावर ( फिक्वेन्सीवर) कार्य करते.

  • हे फोटॉनसिंक सोल्यूशन एक क्वांटम लिंक तयार करते, ज्याचे अनेक उपयोग आहेत.

Communication Technology
Sugarcane Season Bullock Safety: आंबेगावात ऊसतोडीत बैलांच्या खुरांना पत्री; सुरक्षिततेचा पारंपरिक उपाय

‌‘क्वांटम की‌’साठी पहिले स्वदेशी तंत्रज्ञान

या शास्त्रज्ञांनी फेज-सुसंगत फायबरद्वारे फिक्वेन्सी-मॉड्युलेटेड अल्ट्रा-स्टेबल लेझर वापरून एक क्वांटम चॅनल तयार केल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सामान्यतः सुरक्षित डेटा हस्तांतरणासाठी आणि क्वांटम की वितरणासाठी हे पहिले स्वदेशी क्वांटम तंत्रज्ञान आहे.

Communication Technology
Nasrapur Noise Pollution: नसरापूरमध्ये बुलेटच्या ‘ठो-फट्ट’ आवाजाने आणि हायवाच्या हॉर्नने हैराण

फोटॉनसिंक हे एक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान आहे, जे अचूक सेन्सर्स, क्वांटम नोड्‌‍स, लांबपल्ल्याच्या टेलिपोर्टेशन आणि इतर अनेक प्रणालीमध्ये माहिती अचूकपणे वाहून नेण्यासाठी उपयुक्त आहे.

प्रा. डॉ. सुभदीप डे, आयुका, पुणे

आजच्या भारतात, जवळजवळ प्रत्येक नागरिक क्रिप्टोग्राफी वापरकर्ता आहे. कारण ते व्यवहारांसाठी यूपीआय आणि व्हॉट्‌‍सॲपसारखे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड मेसेजिंग ॲप्स यांसारख्या विविध सुविधा वापरतात. तथापि, यापैकी कोणतीही प्रणाली बिनशर्त सुरक्षित नाही. या शोधाद्वारे करता येणारे क्वांटम की डिस्ट्रिब्युशन सुरक्षा प्रदान करण्यास सक्षम आहे, जी डीआरडीओ, लष्कर, नौदल आणि वायुदल यांना फायद्याची होईल.

प्रा. डॉ. अनिर्बन पाठक, जेआयआयटी, नोएडा

या संशोधनाद्वारे, ऑप्टिकल फेज आणि फिक्वेन्सी स्थिरीकरणासाठी स्वदेशी सिग्नल प्रोसेसिंग प्रणाली विकसित करणे हे आमचे ध्येय होते. आम्ही या प्रयत्नात यशस्वी झालो आहोत.

डॉ. स्टॅनली जॉन्सन, जेआयआयटी, नोएडा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news