Pune District Rural Politics: नऊ वर्षांनंतर पुणे जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल
पुणे: तब्बल नऊ वर्षांनंतर होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनी पुणे जिल्ह्याचे ग््राामीण राजकारण पुन्हा तापले आहे. भाजपकडून आमदार, माजी आमदार आणि संघटनात्मक ताकद उभी करण्याचे प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादी काँग््रेासकडून 2017 प्रमाणे पुन्हा सत्ता मिळवण्याचा दावा केला जात आहे. काँग््रेास, शिवसेना (शिंदे व ठाकरे गट) तसेच इतर पक्षांनीही आपापली रणनीती आखत निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला असून तब्बल नऊ वर्षांनंतर पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग््रेास, भाजपसह सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षांसाठी ही निवडणूक 2029 च्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची ताकद, मतदारांचा कल आणि स्थानिक नेतृत्वाची पकड या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी पुणे ग््राामीण भागात भाजपकडे दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या रूपाने केवळ एकच आमदार होता. त्यानंतर भाजपने भोरचे माजी आमदार संग््रााम थोपटे, पुरंदरचे संजय जगताप आणि इंदापूरचे प्रवीण माने यांना पक्षात घेतले. त्यामुळे भोर, पुरंदर आणि इंदापूर भागात संघटना वाढविण्याचे प्रयत्न झाले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांची भाजपने जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करून पक्षाचे वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, इंदापूर नगरपरिषद निवडणुकीतील उमेदवार निवडीवरून राष्ट्रवादी काँग््रेासचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असता गारटकर यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे, जिल्ह्यातील भाजप नेते शरद बुट्टे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग््रेासचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतल्याने ते निवडणुकीच्या तोंडावर भाजप सोडणार असल्याचीही चर्चा आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग््रेासकडून पुन्हा सत्ता मिळवण्याचा दावा केला जात आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवत राष्ट्रवादी काँग््रेासचा पुणे जिल्ह्यातील दबदबा कायम असल्याचे दाखवून दिले.

