Pune Municipal Election Voting: पुणे महापालिका निवडणूक: गुरुवारी मतदान, शहर सज्ज

41 प्रभागांत 163 नगरसेवकांसाठी मतदान; ईव्हीएम, मनुष्यबळ आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त
Vote
VotePudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी शहरात मतदानप्रक्रिया पार पडणार असून, यानिमित्ताने पुणेकर लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होणार आहेत. महापालिका प्रशासनामार्फत निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्तात ईव्हीएम पोहोचले असून, मतदान केंद्र विविध सुविधांनी सुसज्ज करण्यात आले आहेत. या निवडणुकीत दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने शहरातील 41 प्रभागांतून एकूण 165 पैकी 163 नगरसेवक निवडले जाणार आहेत. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडून लोकशाहीचा हक्क बजवावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले.

Vote
Pune Election Satire: देवाभाऊ की दादा? पुणेकरांच्या संभ्रमाची उपरोधिक कथा

तब्बल 9 वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला आहे. नव्या नगरसेवकांच्या स्वागतासाठी महापालिका सज्ज झाली आहे. गेले 15 दिवस निवडणूक प्रचाराची रणधुमाळी बुधवारी शांत झाली. या निवडणुकीसाठी 1153 उमेदवार नशीब आजमावत आहेत. यामध्ये 627 पुरुष, तर 528 महिला उमेदवारांचा समावेश आहे. प्रभागनिहाय पाहता, प्रभाग क्रमांक 6 मध्ये सर्वाधिक 43 उमेदवार निवडणूक लढवत असून, त्यामुळे या प्रभागात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे प्रभाग क्रमांक 35मध्ये दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, त्यांचे प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहेत. आयोगाची अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतर त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे.

Vote
Pune District Rural Politics: नऊ वर्षांनंतर पुणे जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल

शहर विकासाच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक, आरोग्य, शिक्षण यांसह अनेक नागरी प्रश्नांवर निवडून येणारे पुढारी महापालिकेचे धोरण ठरवतील. त्यामुळे मतदारांतही या निवडणुकीबाबत उत्सुकता असून, मोठ्या प्रमाणावर मतदान होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मतदानाच्या माध्यमातून नागरिकांनी आपला हक्क बजावून लोकशाही अधिक मजबूत करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. गुरुवारी होणाऱ्या मतदानामुळे पुणे शहरात खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उत्सव साजरा होणार आहे.

Vote
Quantum Communication Technology: आर्थिक व्यवहार होणार 'झट पट पटापट', आयुकाच्या संशोधनामुळे स्वदेशी क्रांती

मतमोजणी व्यवस्थापन

  • मतमोजणी केंद्रे 15

टेबल संख्या

  • टपाली टेबल संख्या 38

ईव्हीएमसाठी टेबल संख्या 297

प्रभाग क्रमांक 38 मध्ये 5 जागा असून त्याची ईव्हीएम रचना खालीलप्रमाणे

  • पांढरा रंग - जागा क्रमांक अ

  • फिकट गुलाबी - जागा क्रमांक ब

  • फिकट पिवळा - जागा क्रमांक क

  • फिकट निळा - जागा क्रमांक ड

  • फिकट हिरवा - जागा क्रमांक ई

महत्त्वाचे : चार व पाच प्रभागात प्रत्येक रंगाच्या मतपत्रिकेवरील पसंतीच्या उमेदवार/चिन्हासमोरील बटन दाबून प्रत्येकी एक मत असे चार व पाच मते नोंदवावीत.

ईव्हीएमवर अशी असेल मतपत्रिका

  • एकूण प्रभाग 41

चार जागांसाठी मतदान असणारे प्रभाग 40

  • (जागा क्रमांक अ, ब, क, ड)

आरोग्य यंत्रणा

  • आरोग्य कर्मचारी 1200

दिव्यांग मतदारांसाठी 932 व्हीलचेअर

मतदान पथकांची ने-आण करण्यासाठी लागणार 1119 वाहने

  • मोठ्या बसेस- 532

  • मिनी बसेस 9 मीटर - 80

  • मिनी बसेस 7 मीटर - 30

  • मिनीबस - 217

  • सुमो/ एसयूव्ही - 260

  • एकूण - 1119

Vote
Ajit Pawar Free Metro Bus: ‘रिकाम्या तिजोरीत आणे आणू’; मोफत मेट्रो-बसवर अजित पवारांचा ठाम दावा

पक्षानुसार निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांची संख्या

  • भाजप आरपीआय आघाडी 163

  • भाजप 158 आरपीआय 7

  • राष्ट्रवादी कॉंग््रेास आघाडी

  • अजित पवार गट 139

  • शरद पवार गट 34

  • कॉंग््रेास, उबाठासेना, मनसे आघाडी

  • कॉंग््रेास - 92

  • शिवसेना उद्धव ठाकरे गट - 62

  • मनसे - 44

  • शिवसेना शिंदे गट -120

  • आम आदमी पार्टी - 81

  • वंचित -58

  • बसपा -35

  • रासप - 7

  • एमआयएम -8

  • हिंदू महासभा - 6

  • समाजवादी पार्टी - 5

  • इतर पक्ष -24

  • अपक्ष - 276

मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ तैनात

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ तैनात केले आहे. मतदान केंद्रांवर 25,899 कर्मचारी कार्यरत असतील. याशिवाय 454 झोनल अधिकारी, 32 नोडल अधिकारी, 1200 आरोग्य कर्मचारी आणि मतमोजणीसाठी 1056 कर्मचारी नियुक्त केले आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतदार चिठ्ठीवाटपाची प्रक्रिया 8 जानेवारीपासून सुरू असून, आतापर्यंत 85 टक्के वाटप पूर्ण झाले आहे. मतदारांना आपले नाव मतदार यादीत शोधण्यासाठी ऑनलाईन सर्च इंजिनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी शहरात 172 पथके कार्यरत असून, आतापर्यंत प्राप्त झालेल्या बहुतांश तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे.

Vote
Devendra Fadnavis Pune speech: ‘खिशात नाही दाणा, बाजीराव म्हणा’; पुण्यात फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

मतदारांची ओळख पटवण्यासाठी महत्त्वाचे 12 पुरावे

1. भारताचा पासपोर्ट

2. आधार ओळखपत्र

3. वाहन चालविण्याचा परवाना

4. आयकर विभागाकडील ओळखपत्र

5. केंद्र शासन / राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना फोटोसहीत दिलेली ओळखपत्रे

6. राष्ट्रीयकृत बँका अथवा पोस्ट ऑफिस यामधील खातेदाराचे फोटो असणारे पासबुक

7. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला फोटोसहीत अपंगत्वाचा दाखला

8. राष्ट्रीय ग््राामीण रोजगार हमी योजनेखालील, फोटो असलेले ओळखपत्र ( चछठएॠअ ऑव कार्ड)

9. निवृत्त कर्मचाऱ्याऱ्यांची अथवा त्यांच्या विधवा / अवलचित व्यक्ती यांची फोटो असलेली निवृत्ती वेतनविषयक कागदपत्रे उदा. पासबुक, प्रमाणपत्र इ.

10. लोकसभा / राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा / विधानपरिषद सचिवालय यांनी आपल्या सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र

11. स्वातंत्र्यसैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र

12. केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटोसहीत कार्ड

अशी आहे पोलिस प्रशासनाची तयारी!

महापालिका निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी पुणे आयुक्तालयाच्या हद्दीत 14 पोलिस उपआयुक्त, 30 सहायक पोलिस आयुक्त, 7 परिविक्षाधीन सहायक पोलिस आयुक्त, 166 पोलिस निरीक्षक, 723 सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उप निरीक्षक, 12500 पोलिस अंमलदार, 3250 होमगार्ड व एसआरपीएफ 4 कंपन्या असा बंदोबस्त तैनात असेल. शहराचे 143 सेक्टर पाडले असून, तेथे बंदोबस्त लावला आहे. 100 पेक्षा जास्त संवेदनशील ठिकाणे निश्चित केले असून त्यासाठी गुन्हे शाखा इतर शाखेतील पोलिस अधिकारी व अंमलदार यांचा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. निवडणूक प्रक्रिया निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पडण्याच्या अनुषंगाने पुणे शहर पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात 18 स्थिर सर्वेलन्स पथके, 15 फिरते सर्वेलन्स पथके, 15 व्हिडीओ सर्वेलन्स पथके नेमलेले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news