Pune HCMTR Project: पुण्याच्या वाहतूक कोंडीवर उपायासाठी एचसीएमटीआरला पुन्हा गती; ३५ किमी वर्तुळाकार मार्गाचा आराखडा मार्गी लागणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महापालिकेची हालचाल; स्वतंत्र एचसीएमटीआर कक्ष कार्यान्वित होणार, शहरातील प्रमुख भागांना मिळणार जोडणी
HCMTR Project
HCMTR ProjectPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून महापालिकेच्या १९८७च्या विकास आराखड्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट रूट (एचसीएमटीआर) या अंतर्गत वर्तुळाकार मार्गाच्या प्रकल्पाला पुन्हा एकदा गती देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी विशेष समित्यांची स्थापना जाहीर केल्यानंतर महापालिकेनेही या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी स्वतंत्र एचसीएमटीआर कक्ष पुन्हा कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

HCMTR Project
Hoarding Contract: एस. पी. कॉलेज होर्डिंग करारप्रकरणी कारवाई; शिक्षण प्रसारक मंडळीला महापालिका आणि मुद्रांक विभागाची नोटीस

शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्या नेतृत्वाखाली हा स्वतंत्र कक्ष कार्यरत राहणार असून, त्यामध्ये कार्यकारी अभियंत्यांपासून कनिष्ठ अभियंत्यांपर्यंत विविध स्तरांवरील अधिकारी व अभियंत्यांचा समावेश असेल. या कक्षामार्फत एचसीएमटीआर मार्गावरील विविध सेवा वाहिन्यांचे सर्वेक्षण, भूसंपादनासाठी संबंधित जागामालकांशी समन्वय व संवाद, रस्त्याचा आराखडा तयार करणे तसेच प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यापूर्वी २०१९ मध्येही एचसीएमटीआरसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला होता.

HCMTR Project
Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण नाही; सुप्रिया सुळे यांनी चर्चांना दिला पूर्णविराम

मात्र, त्यानंतर कोरोनाच्या संकटामुळे आणि बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे हा महत्त्वाचा प्रकल्प मागे पडला. एवढेच नव्हे, तर गेल्या वर्षी प्रशासनाने एचसीएमटीआरच्या ऐवजी त्याच मार्गावर निओ मेट्रोचा पर्याय पुढे आणल्याने या प्रकल्पावरील चर्चा थंडावली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील वाहतूक प्रश्नावर पुन्हा लक्ष केंद्रित करत भुयारी रस्ते, मेट्रोचे विस्तारीकरण आणि एचसीएमटीआर या तिन्ही पर्यायांचा एकत्रित विचार करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली द्विस्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली असून, दोन दिवसांपूर्वी झालेल्या ऑनलाइन बैठकीत महापालिका आयुक्तांनाही आवश्यक कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

HCMTR Project
India Population Growth 2050: भारताची लोकसंख्या २०५० पर्यंत १.७ अब्जांवर; मात्र लोकसंख्यावाढीचा वेग सातत्याने मंदावणार

एचसीएमटीआर प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये

  • प्रस्तावित मार्गाची लांबी सुमारे ३५.३६ किलोमीटर.

  • शहराच्या मध्यवर्ती भागाभोवती इनर रिंग रोड उभारण्याचा आराखडा.

  • चार लेन सर्वसाधारण वाहनांसाठी, तर दोन स्वतंत्र लेन सार्वजनिक वाहतुकीसाठी प्रस्तावित.

  • सार्वजनिक वाहतुकीसाठी पूर्वी बीआरटीचा विचार होता; आता इतर पर्यायांचाही अभ्यास सुरू.

  • शहरातील मध्यवर्ती रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यावर भर.

HCMTR Project
Pune Primary Schools Morning Session: मतदार यादी पुनरीक्षणासाठी पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांची वेळ बदलली; १३ ते ३० जुलै सकाळच्या सत्रात वर्ग

प्रमुख जोडणी

एचसीएमटीआर मार्ग बोपोडी, औंध, शिवाजीनगर, एरंडवणे, कोथरूड, कर्वेनगर, दत्तवाडी, पर्वती, बिबवेवाडी, वानवडी, हडपसर, मुंढवा, कल्याणीनगर, येरवडा, कळस, विश्रांतवाडी या भागांना जोडत पुन्हा बोपोडी येथे येऊन मिळणार आहे.

प्रकल्पाची उद्दिष्टे

शहरातील वाहतूक कोंडी कमी करणे. सार्वजनिक वाहतुकीला अधिक प्राधान्य देणे. मेट्रो आणि बीआरटीसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांशी एकात्मिक जोडणी निर्माण करणे. शहरातून जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी वर्तुळाकार मार्ग उपलब्ध करून देणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news