Pune Graduate Constituency Election: पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; शंभर टक्के मतदानावर मुरलीधर मोहोळांचा भर

डॉ. स्मिताताई जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा; प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे केंद्रीय राज्यमंत्र्यांचे आवाहन
Pune Graduate Constituency Election
Pune Graduate Constituency ElectionPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: भारतीय जनता पक्षाची मोठी ताकद आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत आपण पोहचायचे असून, त्यांचे शंभर टक्के मतदान करून घेण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. ही जबाबदारी पार पाडून पहिल्याच फेरीत आपले उमेदवार विजयी करायचे आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.

Pune Graduate Constituency Election
Pune RTO Vahan Portal: पुणे आरटीओचे ‘वाहन’ पोर्टल पुन्हा ठप्प; वाहन हस्तांतरणासह अनेक कामांना ब्रेक

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे पदवीधर संघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. सौ. स्मिताताई जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ पुणे कॅन्टो‍न्में‍ट मतदारसंघाच्या वतीने आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री मोहोळ बोलत होते. या वेळी आमदार सुनील कांबळे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, महिला अध्यक्षा मनीषा लडकत, महेश पुंडे यांच्यासह भाजपचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Pune Graduate Constituency Election
Pune District Ration Distribution: पुणे जिल्ह्यात १० लाखांहून अधिक शिधापत्रिकाधारकांना धान्याचा आधार; २,५७८ रास्तभाव दुकानांतून वितरण

या वेळी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, प्रत्येक मंडल अध्यक्षाकडे किती मतदारांची यादी आहे, हे तपासून त्यानुसार नियोजन करण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे मोठी ताकद आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत आपण पोहचू शकतो. या मतदाराला मतदान केंद्रावर घेऊन जाण्याची जबाबदारी असून, शंभर टक्के मतदान करून घेण्याची जबाबदारी आपली आहे. मात्र, ज्या मतदाराला आपण मतदानाला घेऊन जाणार तो आपला आहे का? याची खातरजमा करा, असे मोहोळ यांनी या वेळी बजावले. मागील निवडणुकीत या दोन्ही जागा आपण गमावल्या होत्या. त्याची खंत आपल्याला आहे. त्यामुळे गाफील न राहता कामाला लागा.

Pune Graduate Constituency Election
Aadhaar Portal Outage: आधार पोर्टल ठप्प; राज्यभरातील दस्तनोंदणी रखडली, सरकारच्या महसुलालाही फटका

विजय मिळाला, तरच कष्टाचे चीज होईल, असेही मोहोळ या वेळी म्हणाले. माजी राज्यमंत्री कांबळे म्हणाले की, आपले सर्व नगरसेवक, पदाधिकारी यांनी प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन आपण महायुतीच्या माध्यमातून केलेल्या कामांची माहिती त्यांना द्यावी. त्यानंतर आपल्या उमेदवारांची माहिती देऊन मतदान करण्याचे आवाहन करावे, तर देशभरात कॉक्रोच जनता पक्षाने एक वेगळे आव्हान उभे केले. अशा पक्षांना रोखण्यासाठी या निवडणुकीत आपल्या दोन्ही उमेदवारांना शंभर टक्के निवडून आणण्याचे काम आपल्याला करावे लागेल, असे आवाहन आमदार सुनील कांबळे यांनी केले.

Pune Graduate Constituency Election
MPSC Paper Leak Case: एमपीएससी पेपरफुटी प्रकरण: विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आयोगाचे अध्यक्ष सक्तीच्या रजेवर

डॉ. सौ. स्मिताताई जाधव उच्चशिक्षित उमेदवार

पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव यांना माहेर आणि सासर यांचा मोठा वारसा लाभला आहे. मात्र, त्यापलिकडे जाऊन त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या उच्चशिक्षित उमेदवार आहेत. पदवीधरांच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे, त्यामुळे त्या नक्कीच त्यांना न्याय देतील, असे सांगत राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी डॉ. सौ. स्मिताताई जाधव यांच्या कार्याचे कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news