Aadhaar Portal Outage: आधार पोर्टल ठप्प; राज्यभरातील दस्तनोंदणी रखडली, सरकारच्या महसुलालाही फटका

मुंबईत ऑप्टिकल फायबर केबल तुटल्याने आधार पडताळणी बंद; रात्री उशिरापर्यंत समस्या कायम, पक्षकार-वकिलांना आल्या पावली परतावे लागले
Aadhaar Portal Outage
Aadhaar Portal OutagePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: मुंबईत माहिती तंत्रज्ञान विभागाच्या ऑप्टिकल फायबर केबल तुटल्यामुळे आधार पोर्टल बंद पडले. त्याचा थेट फटका दस्तनोंदणीला बसला. परिणामी, हजारो दस्तांची नोंद न झाल्याने पक्षकार हवालदिल झाले.

Aadhaar Portal Outage
MPSC Paper Leak Case: एमपीएससी पेपरफुटी प्रकरण: विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आयोगाचे अध्यक्ष सक्तीच्या रजेवर

दस्त नोंदणी रखडल्याने राज्य सरकारलाही महसुलाचा मोठा फटका बसला. समस्या दूर झाल्यास दस्त नोंदणी कार्यालये उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे उपमहानिरीक्षक अभयसिंह मोहिते यांनी दिले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत ही समस्या कायम होती.

Aadhaar Portal Outage
Smita Jadhav: पदवीधर निवडणुकीसाठी डॉ. स्मिताताई जाधव यांचा ग्रामीण भागात प्रचाराचा जोर वाढला

दस्त नोंदणी कार्यालयांमध्ये दुपारी साडेतीनच्या सुमारास आधार पडताळणीचे काम ठप्प झाले. त्यामुळे पक्षकारांसह नोंदणी विभागातील कर्मचारीही त्रस्त झाले. अधिक चौकशीअंती मुंबईतील माहिती तंत्रज्ञान विभागाच्या ऑप्टिकल फायबर तुटल्यामुळे आधार पोर्टल बंद पडले.

Aadhaar Portal Outage
Pune 32 Villages Water Supply: पुण्यातील ३२ गावांतील विकसकांना मोठा दणका! महापालिकेचे पाणी येईपर्यंत रहिवाशांना पाणी देणे बंधनकारक

त्यामुळे दस्त नोंदणी रखडली. या समस्येमुळे राज्यातील दस्त नोंदणीवर परिणाम झाला. याबाबत नोंदणी विभागाने तातडीने माहिती तंत्रज्ञान विभागाला कळवले. मात्र, समस्या दूर होण्यास कालावधी लागत असल्याने पक्षकारांना अधिकचा वेळ देण्याबाबत मोहिते यांनी निर्देश दिले. त्यासाठी सर्व कार्यालये रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात येणार होती.

Aadhaar Portal Outage
Pune University Girls Hostel Safety: पुणे विद्यापीठात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; ३०० हून अधिक विद्यार्थिनी मध्यरात्री रस्त्यावर

मात्र, ही समस्या रात्री उशिरापर्यंत कायम होती. त्यामुळे अखेर पक्षकारांसह वकिलांना दस्त नोंदणी न करताच घरी परतावे लागले. या समस्येमुळे किती दस्तांवर परिणाम झाला, तसेच किती महसूल बुडाला याबाबत माहिती मिळू शकली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news