

पुणे: दुष्काळग्रस्त तालुक्यांसह पुणे जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत अन्नधान्याचे वाटप सुरू आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागांतील एकूण २ हजार ५७८ रास्तभाव दुकानांमार्फत लाभार्थ्यांना धान्य उपलब्ध करून दिले जात आहे. यामध्ये ग्रामीण भागातील १ हजार ८८७, तर शहरी भागातील ६९१ दुकानांचा समावेश आहे.
जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत (AAY) ५४ हजार ३२८ शिधापत्रिकाधारकांची नोंद आहे. तसेच, प्राधान्य कुटुंब गटात (PHH) ९ लाख ४६ हजार ८८९ शिधापत्रिकाधारक आहेत. या दोन्ही योजनांतील लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत धान्याचे वितरण केले जात आहे.
शहरी भागात अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत १४७.७५ मेट्रिक टन गहू आणि ९८.५० मेट्रिक टन तांदळाचे नियतन करण्यात आले आहे. प्राधान्य कुटुंब गटासाठी ४ हजार १४५.३५ मेट्रिक टन गहू आणि २ हजार ७२३.७५ मेट्रिक टन तांदळाचे नियतन केले आहे.
१७ हजार मेट्रिक टन करण्यात आले आहे. म्हणजेच एकूण १९ हजार १४.७५ मेट्रिक टन धान्याचे नियतन झाले आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांसह जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून अन्नधान्य उपलब्ध होत असल्याने गरजू कुटुंबांना दिलासा मिळत आहे.
गहू आणि तांदळाचे नियतन
ग्रामीण भागातील अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांसाठी १ हजार ४३.९४४ मेट्रिक टन गहू आणि ६१६.८७६ मेट्रिक टन तांदळाचे नियतन करण्यात आले आहे. प्राधान्य कुटुंब गटासाठी ७ हजार २८७.३९ मेट्रिक टन गहू आणि ४ हजार ८५८.२६ मेट्रिक टन तांदळाचे नियतन आहे.