Smita Jadhav: पुणे पदवीधर निवडणूक: डॉ. स्मिताताई जाधव यांना ३०० हून अधिक कलाकारांचा पाठिंबा

ऑल आर्टिस्ट फाउंडेशन ट्रस्ट आणि संवाद पुणेच्या स्नेहमेळाव्यात पाठिंब्याची घोषणा; कला-सांस्कृतिक क्षेत्रातील नऊ महिलांचा ‘नवदुर्गा सन्मान’ देऊन गौरव
Pune Graduate Constituency Election Smita Jadhav Artists Support
Pune Graduate Constituency Election Smita Jadhav Artists SupportPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: डॉ. स्मिताताई योगेश जाधव यांचे कला-सांस्कृतिक क्षेत्राशी जवळचे नाते आहे. त्यांच्यात प्रभावी नेतृत्वगुण असून, त्या नक्कीच कलाकारांचे प्रश्न सोडवतील, असा विश्वास कलाकारांनी रविवारी (दि. १८) व्यक्त केला. निमित्त होते ऑल आर्टिस्ट फाउंडेशन ट्रस्ट महाराष्ट्र आणि संवाद पुणेच्या वतीने कलाकारांच्या स्नेहमेळाव्याचे. सुमारे ३०० हून अधिक कलाकारांनी मेळाव्याला उपस्थिती लावली अन्‌ पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव यांना पाठिंबा दिला. तसेच, डॉ. जाधव यांना मतदान करण्याचे आवाहनही कलाकारांना करण्यात आले. या मेळाव्यात कला-सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना नवदुर्गा सन्मानाने गौरविण्यात आले.

Pune Graduate Constituency Election Smita Jadhav Artists Support
Winter 2026 Exam Centres: हिवाळी सत्र २०२६ परीक्षांसाठी महाविद्यालयांना तात्पुरती केंद्रमान्यता; दोन परीक्षा केंद्रांवर कायमस्वरूपी बंदी

नवरात्रोत्सवानिमित्त कला-सांस्कृतिक क्षेत्रातील ९ महिलांना स्नेहमेळाव्यात ज्येष्ठ नृत्य गुरू शमा भाटे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या माजी विभागप्रमुख डॉ. शुभांगी बहुलीकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ लेखिका डॉ. संगीता बर्वे, लीना आढाव, डॉ. सुखदा खांडगे, सानिया चौधरी, मधुरा कुलकर्णी, योगिता गोडबोले, अपर्णा चोथे, अदिती द्रविड आदींचा गौरव करण्यात आला. तर, ज्येष्ठ लोककलावंत मीना गायकवाड यांचाही विशेष सन्मान केला. भाजप महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठचे अध्यक्ष आणि अभिनेते रमेश परदेशी, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, ‘संवाद पुणे’चे अध्यक्ष सुनील महाजन, ‘ऑल आर्टिस्ट फाउंडेशन ट्रस्ट’चे अध्यक्ष योगेश सुपेकर, नृत्यदिग्दर्शिका निकिता मोघे उपस्थित होते. तसेच, या मेळाव्याला चित्रपट, नाट्य, मालिका, संगीत, नृत्य, साहित्य क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

Pune Graduate Constituency Election Smita Jadhav Artists Support
Pune Free Health Checkup Camp: पुण्यात नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर; ३५० महिलांनी घेतला लाभ

शमा भाटे म्हणाल्या, की कला-सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी अतिशय मेहनतीने काम करीत असते. गेली अनेक वर्षे नृत्य क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक विद्यार्थीही घडवले आहेत. डॉ. स्मिताताई जाधव यांनी पदवीधर कलाकारांचे प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा. ‘संगीत, नृत्य, साहित्य आणि नाट्य क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आल्याचा खूप आनंद आहे. कलाकारांसाठी गुरूंचे आशीर्वाद आणि कुटुंबीयांचा पाठिंबा महत्त्वाचा असतो, अशी भावना डॉ. बहुलीकर यांनी व्यक्त केली.

Pune Graduate Constituency Election Smita Jadhav Artists Support
Technical Education Institutes Assessment: तंत्रशिक्षण संस्थांचे १६ ते ३० ऑक्टोबरदरम्यान बाह्य मूल्यांकन; मुदत चुकल्यास अभ्यासक्रमांवर कारवाईचा इशारा

पुणे संस्कृतीचे माहेरघर आहे. नाट्य, चित्रपट, संगीत, साहित्य आदी क्षेत्रातील महिलांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांची आवश्यकता असते, असे सांगून सुनील महाजन म्हणाले, की पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष-महायुतीच्या उमेदवार असलेल्या डॉ. स्मिताताई जाधव या उच्च विद्याविभूषित आहेत. त्यांच्या रूपाने आपल्याला हक्काचा माणूस विधान परिषदेत मिळेल. त्या अतिशय कार्यक्षम आहेत. त्यांचे वडील पी. डी. ‌पाटील यांनी साहित्य संमेलनांसाठी आणि एकूणच कला-सांस्कृतिक क्षेत्रासाठी मोठे कार्य केले आहे. कला-सांस्कृतिक क्षेत्रातील पदवीधरांनी निवडणुकीत सहभागी होऊन आपल्या प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या प्रतिनिधीला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Pune Graduate Constituency Election Smita Jadhav Artists Support
Pune Diwali Special ST Buses: दिवाळीत गावी जाणाऱ्यांसाठी खुशखबर! पुणे विभागातून १२०० एसटी गाड्या; धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी पुणे-नागपूर विशेष रेल्वे

डॉ. स्मिताताई जाधव यांच्या उमेदवारीला ‘ऑल आर्टिस्ट फाउंडेशन ट्रस्ट’कडून पाठिंबा जाहीर करून योगेश सुपेकर म्हणाले, डॉ. स्मिताताई जाधव यांचे व्हीजन पदवीधर, बेरोजगार आणि महिला अशा विविध घटकांच्या कल्याणासाठी आहे. त्यामुळे आम्हा कलाकारांचा त्यांना पाठिंबा आहे. ज्या कलाकारांची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यांच्या मुलांना शिक्षणात २५ टक्के सवलत देण्यात यावी, असेही त्यांनी नमूद केले. निकिता मोघे यांनी प्रास्ताविक केले. योगिता गोडबोले यांनी मनोगत व्यक्त केले. अभय गोखले यांनी सूत्रसंचालन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news