Winter 2026 Exam Centres: हिवाळी सत्र २०२६ परीक्षांसाठी महाविद्यालयांना तात्पुरती केंद्रमान्यता; दोन परीक्षा केंद्रांवर कायमस्वरूपी बंदी

लेखापरीक्षण अहवाल आणि प्राप्त तक्रारींनुसार केंद्रमान्यतेत बदल होणार; सिनर्जी स्कूल ऑफ कॉमर्स आणि अश्वमेध कला व वाणिज्य महाविद्यालयावर कारवाई
SPPU
SPPUPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: हिवाळी सत्र २०२६ च्या परीक्षांसाठी महाविद्यालयांना परीक्षा केंद्र म्हणून तात्पुरत्या स्वरूपात मान्यता देण्याबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाने निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये परीक्षा केंद्र म्हणून मान्यता असलेली काही महाविद्यालये, तसेच यंदा नव्याने केंद्रमान्यता न मिळालेली महाविद्यालये यांच्याबाबत स्वतंत्र निकषांनुसार निर्णय घेण्यात आला आहे.

SPPU
Pune Free Health Checkup Camp: पुण्यात नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर; ३५० महिलांनी घेतला लाभ

त्याचबरोबर सिनर्जी स्कूल ऑफ कॉमर्स आणि अश्वमेध कला व वाणिज्य महाविद्यालय या दोन परीक्षा केंद्रांना कायमस्वरूपी बंदी घालण्यात आल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. डॉ. राजेंद्र तलवारे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, महाविद्यालयांना शैक्षणिक वर्ष २०२५-२६ उन्हाळी सत्र परीक्षांपर्यंत परीक्षा केंद्र म्हणून मान्यता देण्यात आलेली होती, अशा परीक्षा केंद्राची मान्यता नेमलेल्या लेखापरीक्षणच्या समितीच्या निर्णयाच्या आधिन राहून हिवाळी २०२६ करिता तात्पुरत्या स्वरूपात मान्यता देण्यात येत आहे.

SPPU
Technical Education Institutes Assessment: तंत्रशिक्षण संस्थांचे १६ ते ३० ऑक्टोबरदरम्यान बाह्य मूल्यांकन; मुदत चुकल्यास अभ्यासक्रमांवर कारवाईचा इशारा

लेखापरीक्षण अहवाल व परीक्षा विभागाकडे प्राप्त तक्रारींवरील कार्यवाहीनुसार अशा केंद्र मान्यतेत बदल होऊ शकतो व याच सत्रापासून प्रभावी असेल. जे महाविद्यालय शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये नवीन सुरू झालेले आहेत व त्यांना परीक्षा केंद्र म्हणून मंजूर करण्यात आलेले नाही व त्यांच्या परीक्षा मागील उन्हाळी सत्र परीक्षा २०२६ मध्ये ज्या केंद्रावर घेण्यात आल्या होत्या.

SPPU
Pune Diwali Special ST Buses: दिवाळीत गावी जाणाऱ्यांसाठी खुशखबर! पुणे विभागातून १२०० एसटी गाड्या; धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी पुणे-नागपूर विशेष रेल्वे

त्याच परीक्षा केंद्रांना हिवाळी सत्र २०२६ साठी तात्पुरत्या स्वरूपात मान्यता देण्यात येत आहे. जे महाविद्यालय शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये सुरू झालेली आहेत त्यांच्या परीक्षा केंद्रासाठी स्वतंत्रपणे परिपत्रक काढण्यात येणार आहे.

SPPU
Nagpur Orange Production: पावसाच्या खंडाचा नागपूरच्या संत्र्यांना फटका; उत्पादन घटले, पुण्यात आवकही रोडावली

परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेवर भर

परीक्षा केंद्रांना मान्यता देताना केवळ विद्यार्थ्यांची संख्या किंवा महाविद्यालयाची मागणी विचारात न घेता, संबंधित केंद्रांवरील उपलब्ध सुविधा आणि परीक्षा प्रक्रियेचे नियम यांना महत्त्व दिले जाण्याची गरज आहे. तात्पुरत्या मान्यतेमुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षेची व्यवस्था होण्यास मदत होऊ शकते; मात्र अंतिम मान्यतेसाठी आवश्यक अटींची पूर्तता करणे महाविद्यालयांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news