

पुणे: विदेशी चलन कमी प्रमाणात खर्च व्हावे, या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या आवाहनामुळे अधिक मासात सोन्याची खरेदी कमी होऊन सराफा व्यवसायावर परिणाम होऊ नये, यासाठी शहरातील सराफा व्यावसायिकांनी नवी योजना सुरू केली आहे. जुने सोन्याचे दागिने देऊन केवळ मजुरी भरून नवे दागिने घेण्याची सुविधा अनेक सराफांकडून दिली जात आहे.
दर तीन वर्षांनी मराठी पंचांगानुसार, एकदा अधिक महिना येतो. पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक महिना असलेल्या या महिन्यात जावयाला घरी बोलावून पंचपक्वान्न जेवण देण्यासह विविध सोन्या-चांदीच्या वस्तूंची भेट देण्याची परंपरा आजही पाळली जाते. अधिक महिन्यामुळे सण-उत्सव लांबणीवर पडले असले, तरी धोंड्याचा महिना सुरू असल्याने
लक्ष्मी-नारायणाची जोडी म्हणून मुलगी व जावयाला सासरवाडीहून आमंत्रण मिळत आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी चलनाची बचत व्हावी, यासाठी नागरिकांना काही काळ सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत अनेकांनी नवे सोने खरेदी करणे थांबविले होते. नागरिकांच्या या निर्णयाचा परिणाम सराफा बाजारावर होऊ नये, यासाठी सराफा व्यावसायिकांनी जुने दागिने मोडून नवे दागिने बनविण्यासाठी नागरिकांना आवाहन केले. त्यास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे चित्र बाजारात दिसून येत आहे.
आखाती युद्धामुळे सुरू झालेल्या भाववाढीचे चटके आता सर्वसामान्यांना चांगलेच जाणवू लागले आहेत. सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ सुरू झाली असून पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी, एमएनजीएल या इंधनांबरोबरच सोने-चांदीचे दरही दिवसेंदिवस दरवाढीचे नवे विक्रम प्रस्थापित करीत आहेत. पेट्रोल, डिझेल, सीएनजी या इंधनांचा पुरवठा या काळात सुरळीत असला; तरी त्यांच्या दरात मात्र सातत्याने वाढ होत आहे. मे महिन्यात तर तब्बल चारवेळा इंधन दरवाढ झाली. युद्धकाळात पेट्रोल, डिझेलचे दर आठ ते नऊ रुपयांनी वाढले; तर एमएनजीएलने सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 4 रुपयांची वाढ केली. सोने-चांदीच्या दरातील वाढही लक्षणीय आहे. या काळात सोन्याच्या दराने 27 हजार रुपयांची उसळी घेत दर 1 लाख 57 हजारांवर पोहचले आहेत.
इराण आणि अमेरिका, इस्रायल या देशांमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर पुणे शहर, पिंपरी-चिंचवड तसेच जिल्ह्याच्या ग््राामीण भागातील इंधनपुरवठ्यावर परिणाम झालेला नव्हता. तसेच, युद्धजन्य परिस्थिती आणि त्यानंतर इंधनाच्या तुटवड्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. त्या वेळी आणि सध्या पुरेसा इंधनसाठा आहे. युद्धजन्य स्थितीतसुद्धा इंधन वेळेवर मिळत होते. मात्र, केवळ युद्धामुळे नागरिक इंधनपुरवठा खंडित होतो की काय, या भीतीने पंपावर गर्दी करून वाहनांमध्ये जादा इंधन भरत होते. पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग््राामीण भागात दरमहा 10 कोटी लिटर पेट्रोल, तर 16 कोटी लिटर डिझेलची विक्री होते. म्हणजेच, दररोज 33 लाख लिटर पेट्रोल, तर 53 लाख लिटर डिझेलचा खप होतो. इंधनाचा हा पुरवठा नियमित राहिला आहे.
महत्त्वाचे मुद्दे
पेट्रोल पंपाची पेट्रोल, डिझेल साठवण क्षमता (कपॅसिटी) 20 हजार लिटर असते.
कोणत्याही पेट्रोल पंपावर किमान दोन ते तीन दिवस पुरेल एवढा साठा असतो (अर्थात संबंधित पेट्रोल पंपावर किती इंधन विक्री होत असते, त्यावर हा साठा किती दिवस पुरतो, हे अवलंबून असते.)
इंधनपुरवठ्यावर परिणाम झाला तरी पंपावर 2 ते 3 हजार लिटर इंधन राखीव ठेवलेले असते.
आपत्कालीन परिस्थितीत त्याचा वापर करता येतो.
इंधनाच्या दरवाढीचा निर्णय हा पूर्णपणे केंद्र सरकार आणि पुरवठादार कंपन्या घेत असतात. त्यामुळे इंधन दरवाढ कधी किती होणार, याबाबत सांगता येणे कठीण असते. युध्दजन्य परिस्थितीत शहर आणि परिसरात कोणत्याही प्रकारचा इंधनपुरवठा विस्कळीत झालेला नव्हता. सध्याही पुरवठा सुरळीत आहे.
धुव रुपारेल, अध्यक्ष, पुणे शहर जिल्हा पेट्रोल-डिझेल असोसिएशन
अधिक महिना, पंतप्रधानांच्या आवाहनामुळे नव्या सोन्याच्या खरेदीवर काहीसा परिणाम झाला असला, तरी ग््रााहकांनी जुने दागिने मोडून नवे दागिने तयार करण्याकडे अधिक कल दाखविला आहे. त्यामुळे बाजारातील व्यवहार सुरू राहण्यास मदत होत आहे. ग््रााहकांनाही कमी खर्चात नवीन डिझाइनचे दागिने मिळत असल्याने या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मयूर देवकर, संचालक, देवकर ज्वेलर्स