Otur Crime: ओतूर हादरलं! मुलानेच केली वडील-भावाची दगडाने ठेचून हत्या

जुन्नर तालुक्यात कौटुंबिक वादातून घडलेले दुहेरी हत्याकांड; आरोपी अटकेत
Otur Crime
Otur CrimePudhari
Published on
Updated on

ओतूर: जुन्नर तालुक्यात रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली असून मुलानेच आपल्या वडील व लहान भावाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना पारगाव तर्फे मढ हद्दीतील बगाडवाडी येथे घडली. या दुहेरी हत्येमुळे संपूर्ण जुन्नर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Otur Crime
Pune Mephedrone Drug Bust: मेफेड्रोन तस्करीवर मोठा प्रहार; 3,700 कोटींचे ड्रग्ज जप्त, विश्रांतवाडीत 340 किलो कच्चा माल सापडला

ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जयराम महादू मुकणे (वय ६०) व राजेंद्र जयराम मुकणे (वय २७) यांची त्यांच्याच मुलगा व भाऊ बाबाजी जयराम मुकणे (वय ३३) याने दगडाने ठेचून हत्या केली. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.सदर घटना मंगळावारी रात्री घडल्याची माहिती मिळाली आहे.

Otur Crime
Methanol Poisoning Effects: मिथेनॉल दारू किती धोकादायक? मेंदू, किडनी, दृष्टीवर तात्काळ परिणामाचा इशारा

घटनेनंतर आरोपी फरार होण्याच्या तयारीत असताना ओतूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला अटक केली. प्राथमिक तपासात जमीन, पैसा व कौटुंबिक कलह यावरून वडील व मुलामध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. या प्रकरणी ओतूर पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news