Pune Mephedrone Drug Bust: मेफेड्रोन तस्करीवर मोठा प्रहार; 3,700 कोटींचे ड्रग्ज जप्त, विश्रांतवाडीत 340 किलो कच्चा माल सापडला

पुणे पोलिसांची राज्यभर कारवाई; कुरकुंभ कारखाना उध्वस्त, आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा शोध सुरू
Drug
Drug
Published on
Updated on

पुणे: पुणे पोलिसांनी पुणे, दिल्ली, कुरकुंभ, सांगली परिसरात छापे टाकून तीन हजार 700 कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. आरोपींच्या चौकशीत मेफेड्रोन तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची माहिती मिळाली. या प्रकरणात अटक केलेल्या एका आरोपीने कच्चा माल विश्रांतवाडीत एका टेम्पोत लपवून ठेवल्याचे तपासात उघडकीस आल्यानंतर शनिवारी गुन्हे शाखेच्या पथकाने 340 किलो कच्चा माल जप्त केला. यात रासायनिक पदार्थांचा समावेश असून, त्याचा वापर मेफेड्रोन, मेथ असे अमली पदार्थ तयार करण्यासाठी केला जात असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

Drug
Methanol Poisoning Effects: मिथेनॉल दारू किती धोकादायक? मेंदू, किडनी, दृष्टीवर तात्काळ परिणामाचा इशारा

गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी विश्रांतवाडीत छापा टाकला. तेथे एका टेम्पोत लपवून ठेवलेला कच्चा माल जप्त केला असून, कच्चा माल तपासणीसाठी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवून देण्यात येणार आहे. तपासणीनंतर कच्च्या मालातील रासायनिक पदार्थांची माहिती मिळणार आहे, असे पालिस आयुक्तांनी नमूद केले.

Drug
RTE Admission Irregularities: आरटीई प्रवेश प्रक्रियेत गैरव्यवहाराचा संशय; चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती

मेफेड्रोन तस्करी देश-परदेशात करण्यात आली. पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत एका कारखान्यात मेफेड्रोन तयार केले जात होते. तेथे छापा टाकून कोट्यवधी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. या प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपींना अटक केली असून, मेफेड्रोन तस्करीचा मुख्य सूत्रधार संदीप धुनिया परदेशात पसार झाल्याची माहिती मिळाली आहे. मेफेड्रोन विक्री प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची चौकशी करण्यात आली.

Drug
Maharashtra School Reopening: 15 जूनलाच वाजणार शाळेची घंटा; ऑनलाइन शिक्षणाच्या चर्चांना पूर्णविराम

तेव्हा आरोपींनी मेफेड्रोन तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल विश्रांतवाडीतील एका टेम्पोत लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे छापा टाकून 340 किलो कच्चा माल जप्त केला. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मेफेड्रोन विक्री प्रकरणात एका हॉटेल कामगाराला शुक्रवारी अटक केली. त्याच्याकडून दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले.

Drug
APMC User Charges: युजर चार्जेसविरोधात व्यापाऱ्यांचा एल्गार; 13 जूननंतर तीव्र आंदोलनाचा इशारा

या प्रकरणात पिंपरीतील सहायक निरीक्षक विकास शेळके सामील असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. याबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला. पुणे पोलिसांनी केलेला तपास आणि कारवाई कौतुकास्पद आहे. पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. खोकल्याचे औषध (कफ सिरप) निर्मितीसाठी ज्या रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो, त्याच पदार्थांचा वापर मेफेड्रोन, मेथ असे अमली पदार्थ तयार करण्यासाठी केला जात असण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news