Pune Ganeshotsav Makhar: गणरायासाठी यंदा मखरांची ‘क्रेझ’; शनिवारवाड्यापासून गडकिल्ल्यांपर्यंतच्या संकल्पनांना पसंती

पर्यावरणपूरक मखरांना वाढती मागणी; फोल्डिंग, पुनर्वापर करता येणारे आणि फुलांच्या आकारातील मखरांनी बाजारपेठ सजली
Ganeshotsav Makhar
Ganeshotsav MakharPudhari
Published on
Updated on

पुणे: गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच घराघरांत गणेशोत्सवाच्या सजावटीची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी आकर्षक आणि वेगळ्या प्रकारच्या डिझाइनमधील मखर खरेदी करण्याला प्राधान्य दिले जात आहे. यंदा बाजारपेठांमध्ये मंदिरांपासून गड- किल्ल्यांपर्यंतच्या विविध संकल्पनांवरील मखर लक्ष वेधून घेत आहेत.

Ganeshotsav Makhar
Maza Bappa 2026: ‘आपला बाप्पा’ विद्यार्थ्यांनीच घडविला; शाडूमातीच्या मूर्तींतून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

शनिवारवाडा, पालखी, थ्रीडी महाल, सिंहगडापासून रायगडापर्यंतचे गडकिल्ले, केदारनाथ मंदिरापासून मोदक मंदिरापर्यंतचे मखर, अशा वैविध्यपूर्ण मखरांनी दालने सजली आहेत. पर्यावरणपूरक मखरांना नागरिकांकडून मागणी असून, कागद, लाकूड, पुठ्ठा, कापड, कार्डबोर्ड पेपर, बांबू, फोमशीट अशा विविध साहित्यांपासून तयार केलेले पर्यावरणपूरक मखर बाजारात उपलब्ध आहेत. आकर्षकता आणि पर्यावरणपूरकता यांचा मेळ साधणाऱ्या या मखरना नागरिकांकडून पसंती मिळत आहे.

Ganeshotsav Makhar
Agriculture Department Pen Down Protest: कृषी विभागाच्या प्रस्तावित आकृतीबंधाविरोधात राज्यभर ‘लेखणी बंद’; कृषी अधिकारी-कर्मचारी आक्रमक

यंदाही पर्यावरणपूरक मखर खरेदीला प्रतिसाद

गणेशोत्सवाच्या सजावटीतील मखर हा महत्त्वाचा भाग मानला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरणपूरक मखर खरेदीला चांगला प्रतिसाद आहे. एलईडी दिव्यांची विद्युतरोषणाई असलेले मखर, प्राचीन मंदिरांच्या प्रतिकृती, मयूरासन, सिंहासन, ब्रह्मांडनायक, श्री विठ्ठल यांची मूर्ती असलेले मखर, कारंजे असलेले मखर, रंगबिरंगी पडद्यांच्या साहाय्याने तयार केलेले मखर, अशा विविध प्रकारचे मखर पाहायला मिळतील. रविवार पेठेतील बोहरी आळी, लक्ष्मी रस्ता, कॅम्प, खडकीसह विविध बाजारपेठांमध्ये मखर खरेदीसाठी लगबग पाहायला मिळत आहे.

Ganeshotsav Makhar
Sunetra Pawar: हिंजवडीच्या वाहतूक कोंडीसह चाकणच्या विकासाचा आराखडा; सुनेत्रा पवारांनी प्रशासनाला दिले ‘ॲक्शन प्लॅन’चे आदेश

शिवकालीन इतिहास उलगडणाऱ्या मखरांपासून वेगवेगळ्या रंगसंगती असलेल्या मखरांपर्यंत अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. बासरी, एकदंत, मोरया, ओम अशा प्रकारांतील मखरही पाहायला मिळतील. सूर्यफूल, कमळ, गुलाब, जास्वंद या फुलांच्या आकारातील मखरना विशेष मागणी आहे. श्री गणेश मंदिरांच्या प्रतिकृती, शिवमंदिरे तसेच छोटे कारंजे असलेल्या मखरनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. फोल्डिंग मखर, पुनर्वापर करता येणारे मखर, वारकरी, मिररवर्क मखर, शेतकरी, गावकडचा गणेशोत्सव असे प्रकारही उपलब्ध आहेत.

Ganeshotsav Makhar
Pashchim Maharashtra Education Trust Teachers: ‘सेवासमाप्त कर्मचारी’ म्हणणे चुकीचे; पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टमधील शिक्षकांचा दावा

मखरसाठीचे साहित्य खरेदी करण्याकडे कल

पर्यावरणपूरक तयार मखरना मागणी आहेच; पण स्वत:च्या संकल्पनेप्रमाणे घरीच मखर तयार करण्यासाठीचा ट्रेंडही वाढला आहे. त्यामुळे मखरसाठी लागणारे साहित्यही खरेदी करण्याकडे कल आहे. कागद, पुठ्ठा, फोमशीट यातून तयार केलेले साहित्य खरेदी केले जात आहेत. मखर तयार करण्यासाठी लागणारे खांब, कळस, कमान, आर्टिफिशिअल फुले, असे साहित्य खरेदी करण्यालाही प्राधान्य दिले जात असल्याचे रविवार पेठेतील मखर विक्रेते धमेंद्र प्रजापती यांनी सांगितले.

मखर खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक जण गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक मखरची खरेदी करीत आहेत. त्यामुळे यंदा कागदापासून लाकडापर्यंत विविध साहित्यांपासून तयार केलेले मखर उपलब्ध आहेत. मंदिरे, गडकिल्ले, फुलांसह विविध संकल्पनांवरील मखरना मागणी आहे.

वीरेन, मखर विक्रेते, रविवार पेठ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news