Sunetra Pawar: हिंजवडीच्या वाहतूक कोंडीसह चाकणच्या विकासाचा आराखडा; सुनेत्रा पवारांनी प्रशासनाला दिले ‘ॲक्शन प्लॅन’चे आदेश

गुरुवारी तातडीची बैठक; मेट्रो, भूसंपादन, रस्ते, पार्किंग, कचरा व्यवस्थापन आणि अतिक्रमणांच्या प्रश्नांवर होणार चर्चा
Sunetra Pawar
Sunetra PawarPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे जिल्ह्याच्या विकासकामांना गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी आता प्रशासनाला कामाला लावले आहे. हिंजवडी आयटी पार्क, माण-मारुंजी परिसरातील वाहतूक कोंडी, भूसंपादनाचा तिढा, मेट्रो आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर गुरुवारी तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.

Sunetra Pawar
Pashchim Maharashtra Education Trust Teachers: ‘सेवासमाप्त कर्मचारी’ म्हणणे चुकीचे; पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टमधील शिक्षकांचा दावा

या बैठकीला पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, पीएमआरडीए आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच मेट्रो व उद्योग-वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Sunetra Pawar
Laxman Hake OBC Morcha: हैदराबाद गॅझेटची हाके यांनी केली होळी; बावनकुळे यांच्या फोननंतर ओबीसी एल्गार मोर्चा स्थगित

दरम्यान, चाकणच्या सर्वांगीण विकासासाठीही सुनेत्रा पवार यांनी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. रस्ते, वाहतूक, पार्किंग, कचरा व्यवस्थापन, सुरक्षा आणि अतिक्रमणांसारख्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चाकण एमआयडीसीतील कंपन्यांच्या स्थलांतराच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हा विषय अधिक गंभीर बनला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news