Pune Ganeshotsav: ‘पुणे पॅटर्न’ने साजरा करूया गणेशोत्सव; डीजे, प्रेशर मिड अन् प्लाझ्माला पोलिसांचा ठाम विरोध

पुणेकरांना बदल हवा; नियम पाळणाऱ्या मंडळांचे स्वागत, बेशिस्तांविरुद्ध कठोर कारवाईचा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा
Ganeshotsav Sound System Ban
Ganeshotsav Sound System BanPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरात विविध उत्सवादरम्यान डीजे लावला जातो. यामुळे मात्र लोक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे प्रेशर मिड आणि प्लाझ्मा बंदच ठेवणे ही आमची भूमिका आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय बैठक घेतली. पुणेकरांना बदल हवा आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी पुणे पॅटर्न तयार करू, सर्वांसमोर नवीन आदर्श ठेऊया. पुणेकर नागरिक नियमांचे पालन करणारे असून, सर्वांना सोबत घेऊन उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्याचे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.

Ganeshotsav Sound System Ban
Pune Cantonment Board GST Arrears: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाची ७५० कोटींची जीएसटी थकबाकी; दशकभरापासून बैठका सुरू, निधीचा मात्र पत्ता नाही!

पुणे पोलिसांच्या विघ्नहर्ता ट्रस्टच्या वतीने शिवाजीनगरमधील पोलिस मुख्यालयात आयोजित शिष्यवृत्ती वितरण समारंभ आणि आदर्श गणेशोत्सव स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. या वेळी सहपोलिस आयुक्त संजय दराडे, अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, विघ्नहर्ता ट्रस्टचे विश्र्वस्‍त डॉ. मिलिंद भोई यांच्यासह पोलिस अधिकारी, न्यासचे पदाधिकारी तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Ganeshotsav Sound System Ban
Pune Ganeshotsav: गणेशोत्सवाचा जल्लोष हवाच; पण कर्णकर्कश DJ नको! पुणेकरांचा ‘पुढारी’च्या वृत्तावर सूर

न्यायालयाच्या आदेशानुसार नियमांचे पालन करणे आपली जबाबदारी आहे. पुणेकर नागरिक शिस्त पाळतात. त्यामुळे यंदाच्या वर्षी आपण दहीहंडी, गणेशोत्सव कालावधीत डीजे वादनाला दूर ठेउयात, असे आवाहन या वेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले. ईदच्या काळातही बहुतांश नागरिकांनी नियमांचे पालन केल्याचे पोलिसांनी सांगितले. सुमारे ९९ टक्के नागरिकांनी नियम पाळले, मात्र काहींकडून नियमभंग झाल्याने त्यांच्यावर कारवाई करून संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. नियम न पाळणाऱ्यांनी डीजे सिस्टिम लागलीच लातूर आणि हुबळी येथे नेली. पण ती पोलिसांनी तेथून जप्त केली.

Ganeshotsav Sound System Ban
Pune Ganeshotsav DJ: गणेशोत्सवात DJ-लेझरचा अतिरेक थांबवा; उत्सवाचे पावित्र्य आणि नागरिकांचे आरोग्य जपा

सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे

पोलिस आयुक्त म्हणाले, पुणे शहर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. प्लाझ्मा आणि प्रेशर मिडचा वापर बंद ठेवण्याची पोलिसांची भूमिका कायम असून, गणेश मंडळांनी उत्सव साजरा करताना सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. गेल्या वर्षी ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारी आल्या आहेत. यंदा पोलिसांनी सुरुवातीपासून नियोजन केले. याअनुषंगाने पोलिसांनी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. ‘पुणेकर डीजेने त्रस्त झाले आहेत. त्यांना बदल हवा आहे. ध्वनिप्रदूषण कमी झाले पाहिजे. त्यामुळे गणेश मंडळे, कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्रितपणे नियम पाळण्याचे आवाहन आहे. गणेशोत्सवात नियमांचे पालन करणार्‍या मंडळांचे पोलिसांकडून स्वागत केले जाणार आहे. मात्र, निमयभंग करणार्‍या बेशिस्तांविरुद्ध कारवाईची भूमिका आहे. शहरातील प्रत्येक परिमंडळातील उत्कृष्ट व सामाजिक व समाजउपयोगी देखावे सादर करणाऱ्या गणेश मंडळांना प्रथम, द्वित्तीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ असे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

Ganeshotsav Sound System Ban
Pune Road Potholes: पुण्याचे रस्ते खड्ड्यांत की खड्ड्यांत रस्ते?; गणेशोत्सवापूर्वी सुविधांसाठी महापालिकेला निवेदन

उत्कृष्ट गणपती मंडळ विजेते

पुणे विघ्नहता न्यासच्‍या वतीने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्‍तीचे वाटप करण्यात आले. यावेळी परिमंडळ एक हद्दीतील मंडळ - प्रथम क्रमांक - सहकारनगर तरुण मंडळ, रविवार पेठ, द्वितीय क्रमांक - शिवाजी चौक मित्रमंडळ, पुणे, तृतीय क्रमांक - श्रीकृष्ण तरुण मंडळ ट्रस्ट, परिमंडळ दोन - प्रथम क्रमांक - साई मित्रमंडळ, आंबेगाव पठार, द्वितीय क्रमांक - साईनाथ तरुण मंडळ, भोपळे चौक, कॅम्प, तृतीय क्रमांक - जय महाराष्ट्र मंडळ, तानाजीनगर, धनकवडी, परिमंडळ तीन - प्रथम क्रमांक- श्री शनी बाल मारुती मित्रमंडळ, एरंडवणा, द्वितीय क्रमांक - स्वराज्य मित्रमंडळ, कोंढवे धावडे, समस्त गावकरी मंडळ, तृतीय क्रमांक - अचानक मित्रमंडळ पौड फाटा. उंबर्‍या गणपती मंडळ धायरी, परिमंडळ चार - प्रथम क्रमांक - मधला बाजार मित्रमंडळ, खडकी, द्वितीय क्रमांक - शिवराज मित्रमंडळ, कळस, माळेवाडी, तृतीय क्रमांक - आझाद मित्रमंडळ ट्रस्ट, विठ्ठलनगर, वडगाव शेरी परिमंडळ पाच - प्रथम - हनुमान आझाद मंडळ ट्रस्ट, कोंढवा, द्वितीय - हमालनगर मित्रमंडळ, तृतीय-युथक्लब मंडळ, हडपसर.

गणपती विसर्जन मार्ग उत्कृष्ट मंडळ निवड

नवकिरण तरुण मंडळ, नाना पेठ, श्री शिवछत्रपती मित्रमंडळ, गुरुवार पेठ, गरुड गणपती गजानन मंडळ, लक्ष्मी रोड, नारायण पेठ, जागृत गणपती मंडळ ट्रस्ट, रास्ता पेठ, अहिल्यादेवी होळकर चौक, शनिवार पेठ, बालविकास मित्रमंडळ, शनिवार पेठ.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news