Pune Ganeshotsav Dekhava: पुण्यात ‘देखावा फिव्हर’; गणेशोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी मंडळांमध्ये भाविकांची तुफान गर्दी

भव्य महाल, जिवंत-हलते देखावे अन् विद्युत रोषणाईचे आकर्षण; चिमुकल्यांपासून तरुणाईपर्यंत ‘सेल्फी-रिल्स’ची क्रेझ
Pune Ganeshotsav Dekhava
Pune Ganeshotsav DekhavaPudhari
Published on
Updated on

पुणे: वडिलांच्या खांद्यावर बसून डोळे विस्फारून भव्य-दिव्य महल, देखावे न्याहाळणारे चिमुकले... 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष करत गर्दीतून वाट काढणारे गणेशभक्त... आकर्षक विद्युत रोषणाई अन् गणरायाचे मोहक रूप मोबाईलमध्ये टिपण्यासाठी उंचावलेले असंख्य हात... सेल्फी आणि रिल्स करण्यात रमलेली तरुणाई... तर जिवंत, हलते आणि समाजप्रबोधनपर देखावे पाहण्यासाठी सहकुटुंब आलेले पुणेकर... अशा उत्साही वातावरणामुळे गणेशोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी शहराच्या मध्यवर्ती पेठांसह उपनगरांमध्ये उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला.

Pune Ganeshotsav Dekhava
Pune Bharat Gyan Mandapam: भारत ज्ञान मंडपमची पुण्यातून मुहूर्तमेढ; भांडारकर संस्थेकडे पश्चिम भारताची जबाबदारी

दीड दिवसांच्या घरगुती गणपतींना भावपूर्ण निरोप दिल्यानंतर अनेक पुणेकरांची पावले सार्वजनिक मंडळांच्या गणरायाच्या दर्शनाकडे वळली. मानाच्या पाच गणपतींसह प्रमुख मंडळांच्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती. शहराच्या मध्यवर्ती भागातील विविध पेठा गर्दीने फुलून गेल्या होत्या. त्यामुळे, लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्त्यावर गणेश भक्तांचा उत्साह दिसून येत होता.

Pune Ganeshotsav Dekhava
Swaysiddha Women Self Defense Scheme: ‘स्वयंसिद्धा’ महिला स्वसंरक्षण योजना कायमची बंद; २००३ पासून सुरू असलेल्या उपक्रमाला शासनाचा ब्रेक!

उत्सवाला सुरुवात झाल्यानंतर मंडळांनी उभारलेले भव्य देखावे आता पूर्णपणे खुले झाल्याने ते पाहण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे. पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाची उत्सुकता सर्वत्रच असते. या गर्दीत पुणेकरांप्रमाणेच अन्य गावांहून आलेल्या नागरीकांची मोठ्या प्रमाणात समावेश होता. ऐतिहासिक मंदिरे, राजवाडे आणि महालांच्या प्रतिकृतींबरोबरच सामाजिक संदेश देणारे देखावे भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. जिवंत आणि हलत्या देखाव्यांपुढे विशेषतः बालचमूची गर्दी होत आहे. विद्युत रोषणाईने उजळून निघालेले मंडप आणि रस्तेही पुणेकरांसाठी आकर्षण ठरत आहेत.

Pune Ganeshotsav Dekhava
Pune Mandai Encroachment: गणेशोत्सवाच्या तोंडावर मंडईतील अतिक्रमणांवर हातोडा; जेसीबीने पत्राशेड, स्टॉल अन् हातगाड्या जमीनदोस्त!

गणरायाचे मोहक रूप कॅमेऱ्यात साठविण्याची तरुणाईमध्ये

जणू स्पर्धाच लागल्याचे चित्र होते. कुणी बाप्पासोबत सेल्फी घेत होते, तर कुणी रिल्ससाठी व्हिडीओ तयार करण्यात मग्न होते. गर्दीतून अधूनमधून उंचावणारे मोबाईलही लक्ष वेधून घेत होते. दुसरीकडे फुगे आणि खेळणी घेण्यासाठी बालचमूचा हट्ट सुरू होता. बाप्पाचे दर्शन आणि देखावे पाहिल्यानंतर खाद्यपदार्थांच्या स्टॉलकडेही पुणेकरांची पावले वळत होती. मंडळांच्या ठिकाणी भाविकांना सूचना देणे, दर्शनाची रांग सुरळीत ठेवणे आणि देखाव्यांचे नियोजन करण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. भक्तिगीतांचे सूर, 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष आणि रोषणाईने उजळलेले रस्ते यामुळे मध्यवर्ती पुण्यासह उपनगरांमध्ये रात्री उशिरापर्यंत चैतन्यपूर्ण वातावरण अनुभवायला मिळत होते. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी शहरातील महत्त्वाचे रस्ते वाहुतकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे, अनेकांनी दुचाकी, चारचाकीपेक्षा मेट्रो, बस यासारख्या सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर केल्याचे दिसून आले.

Pune Ganeshotsav Dekhava
Pune Zilla Parishad CSR Portal: पुणे जिल्ह्यातील ग्रामीण विकासाला ‘सहयोग’ची साथ; सीएसआर निधीसाठी जिल्हा परिषदेचे स्वतंत्र पोर्टल!

चिमुकल्यांपासून तरुणाई पर्यंत ‘देखावा फिव्हर’

मंदिरे, महालांच्या भव्य प्रतिकृती, जिवंत आणि हलते देखावे, सामाजिक संदेश देणारी दृश्ये आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी विद्युत रोषणाई यामुळे यंदाचे देखावे आबालवृद्धांचे आकर्षण ठरत आहेत. विशेषतः हलते आणि जिवंत देखावे पाहताना चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल आणि आनंद दिसत होता. तरुणाईमध्ये मात्र 'सेल्फी आणि रिल्स'ची क्रेझ पाहायला मिळाली. प्रत्येक आकर्षक देखावा मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी तरुण-तरुणींची लगबग सुरू होती. त्यामुळे गणेशोत्सवातील पारंपरिक देखाव्यांना यंदा 'डिजिटल' रंगही चढल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news