Pune Ganeshotsav: पुण्यात गणेशोत्सव, दहीहंडी निर्बंधमुक्त करा; सर्वपक्षीय नेत्यांची पोलिसांकडे मागणी

डीजे-ध्वनिवर्धकाच्या नियमांचे पालन करण्याचे पोलिसांचे आवाहन; उत्सवाच्या नियोजनात मंडळांच्या सूचनांचा विचार
Ganeshotsav
GaneshotsavFile Photo
Published on
Updated on

पुणे: दहीहंडी उत्सव तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तालयात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक शनिवारी पार पडली. यावेळी गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव निर्बंधमुक्त असायला हवा, अशी मागणी पोलीस आयुक्तालयात पार पडलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत करण्यात आली.

Ganeshotsav
Pune Investment Fraud: कच्च्या तेलातील गुंतवणुकीचे आमिष; १० जणांना २ कोटी ७४ लाखांची चपत

दरम्यान, गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. डीजे आणि स्पीकरबाबत दिलेल्या नियमावलींचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले. याप्रसंगी आमदार हेमंत रासने, भाजपचे गटनेते गणेश बिडकर, शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) रवींद्र माळवदकर, शिवसेना (शिंदे गट) किरण साळी, हेमंत बागुल यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Ganeshotsav
Pune Country Made Pistols Seized: सिंहगड रोड पोलिसांची मोठी कारवाई; तीन गावठी पिस्तुले, चार जिवंत काडतुसे जप्त

पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. प्रशांत अमृतकर उपस्थित होते. 'गणेशोत्सव उत्साहात, तसेच नियमांचे पालन करून साजरा करावा. उत्सवाच्या काळात गर्दी, वाहतूक व्यवस्थापन या बाबी महत्त्वाच्या आहेत. ध्वनिप्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने नियमावली जाहीर केली आहे. गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना कार्यकर्त्यांनी नियमांचे पालन करावे. कार्यकर्त्यांच्या सूचना विचारात घेऊन प्राणप्रतिष्ठा सोहळा, तसेच विसर्जन सोहळ्याचे नियोजन करण्यात येणार आहे. याबाबतची नियमावली जाहीर करण्यात येईल. कार्यकर्त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे', असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केले.

Ganeshotsav
Naxalism Targeting Youth: तरुणांच्या असंतोषावर नक्षलवादी विचारांचे जाळे?; राजीव रंजन प्रसाद यांचा गंभीर दावा

कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन पोलिसांनी नियमावली करावी. एकतर्फी निर्बंध उत्सवावर लादू नये. पुण्यातील गणेशोत्सवाला वैभवशाली परंपरा आहे. कार्यकर्ते सजग आहेत. गणेशाेत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आला. उत्सवाच्या कालावधीत देश तसेच परदेशातून भाविक येतात. गणेशोत्सव निर्बंधमुक्त हवा, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.

हेमंत रासने, आमदार, भारतीय जनता पक्ष, कसबा मतदारसंघ

Ganeshotsav
Maharashtra Cooperative Banks: जिल्हा बँकांच्या सत्ताकेंद्रासाठी नवा डाव; ‘दहा वर्षे’ नियमाला राज्य सरकारची फरकत?

गणेशोत्सवाला १३२ वर्षांची वैभवशाली परंपरा आहे. उच्चक्षमतेच्या ध्वनीवर्धक यंत्रणा, लेझर दिव्यांच्या झोताला विरोध आहे. कालानुरूप उत्सवात बदल होत गेले. विधायक काम करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी उभे राहायला हवे. राज्य उत्सव जाहीर केल्यानंतर निधी उपलब्ध करून दिला जातो. या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने व्हायला हवा. उत्सवासाठी करण्यात आलेली नियमावली महिनाभर आधी जाहीर करण्यात येते. गणेशोत्सवात पूर्वीपासून तरुण कार्यकर्ते सहभागी होतात. नियमांचे पालन करणे करणे गरजेचे आहे. उत्सव हा निर्बंधमुक्त असायला हवा.

रवींद्र माळवदकर, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news