Pune Investment Fraud: कच्च्या तेलातील गुंतवणुकीचे आमिष; १० जणांना २ कोटी ७४ लाखांची चपत

दरमहा ५ ते १० टक्के परताव्याचे प्रलोभन; कोंढवा पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
Crude Oil
Crude OilPudhari
Published on
Updated on

पुणे: आखाती देशातील कच्चा देलाच्या व्यवसायामधील गुंतवणुकीवर दरमहा पाच ते दहा टक्के परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत १० जणांची २ कोटी ७४ लाख ९४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Crude Oil
Pune Country Made Pistols Seized: सिंहगड रोड पोलिसांची मोठी कारवाई; तीन गावठी पिस्तुले, चार जिवंत काडतुसे जप्त

याप्रकरणी, कोंढवा पोलिसांनी गोहर उल इमान अंगोलकर, फराहदिबा अंगोलकर, (रा. दोघे बेलगम कर्नाटक), साजिद अनिफ नावडेकर, शाहीद अनिफ नावडेकर (रा. दोघे पनवेल रायगड) या चौघांविरुद्ध फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण (आर्थिक आस्थापनांमध्ये) अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सुमीत भरत नानावटी (वय ३८, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०२३ ते २१ ऑगस्ट २०२६ दरम्यानच्या कालावधीत घडला आहे.

Crude Oil
Naxalism Targeting Youth: तरुणांच्या असंतोषावर नक्षलवादी विचारांचे जाळे?; राजीव रंजन प्रसाद यांचा गंभीर दावा

गोहर उल इमान अंगोलकर हा आखाती देशातून कच्चे तेल विकत घेऊन ते भारत उपखंड, आफ्रिका, युरोप या देशात विक्री करतो. तेलाच्या भावात होणाऱ्या चढ-उतारामुळे त्याच्या कंपनीला मोठा फायदा होतो.

Crude Oil
Maharashtra Cooperative Banks: जिल्हा बँकांच्या सत्ताकेंद्रासाठी नवा डाव; ‘दहा वर्षे’ नियमाला राज्य सरकारची फरकत?

त्याच्या कंपनीत जर तुम्ही गुंतवणूक केली, तर महिना पाच ते दहा टक्के परतावा मिळेल, असे प्रलोभन आरोपी साजिद आणि शाहीद या दोघांनी फिर्यादींना दाखवले. तसेच एक वर्षानंतर गुंतवणूक केलेली रक्कम देखील परत मिळेल, असे सांगत आरोपींनी फिर्यादी व इतर नऊ जण अशा १० जणांकडून गुंतवणुकीच्या बहाण्याने ४ कोटी ९ लाख ९४ हजार रुपये घेतले.

Crude Oil
National Teachers Award 2026: राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६: महाराष्ट्रातील चार शिक्षकांची राष्ट्रीय पातळीवर निवड

त्यापैकी एक कोटी ३५ लाख रुपये त्यांना परत केले. मात्र, राहिलेले २ कोटी ७४ लाख ९४ हजार रुपये परत केले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक खेतमाळस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news