Pune Ganesh Visarjan: ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात आज दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप!

पुण्यात विसर्जनासाठी महापालिका सज्ज; १५ प्रमुख घाटांवर २४ तास सुरक्षा, ९० जीवरक्षक तैनात
Ganesh Visarjan Ghats
Ganesh Visarjan GhatsPudhari
Published on
Updated on

पुणे: गणेशोत्सवातील दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. विसर्जन हौद, लोखंडी टाक्या, निर्माल्य संकलन केंद्रे, मूर्ती संकलन केंद्रे यांसह जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नदीपात्रातील संभाव्य गर्दी लक्षात घेऊन शहरातील १५ प्रमुख घाटांवर अग्निशमन विभागाकडून २४ तास सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन न करता कृत्रिम हौदांचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Ganesh Visarjan Ghats
Pune Ganeshotsav: ‘मोरया मोरया’च्या जयघोषात पुण्यनगरी गणेशमय; मानाच्या पाचही गणरायांचे दिमाखात आगमन!

महापालिकेच्या नियोजनानुसार शहरात ३७ बांधलेले विसर्जन हौद आहेत. त्यापैकी ३५ ठिकाणी हौदांची व्यवस्था केली आहे. याशिवाय ३८ ठिकाणी ६९ अतिरिक्त कृत्रिम हौद उभारले आहेत. २८१ ठिकाणी ६४८ लोखंडी टाक्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. निर्माल्य संकलनासाठी २७४ ठिकाणी ३२८ केंद्रे उभारली आहेत. तसेच मूर्ती संकलन केंद्रे आणि दान केंद्रांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

Ganesh Visarjan Ghats
India Rice Production: तांदूळ उत्पादनाला यंदा मोठा फटका; ७० लाख टनांची घट होण्याची शक्यता!

अमृतेश्वर, पुलाची वाडी, नटराज सिनेमा, ओंकारेश्वर, वृद्धेश्वर, गरवारे कॉलेज, पांचाळेश्वर, अष्टभुजा मंदिर, संगम, विठ्ठल मंदिर, बाप्पू घाट, ठोसर पागा, चिमा उद्यान, येरवडा, दत्तवाडी आणि वारजे स्मशानभूमी घाटांचा सुरक्षा व्यवस्थेत समावेश करण्यात आला आहे. या घाटांवर अग्निशमन दलाच्या फायरमनसह जीवरक्षक तैनात राहणार आहेत. विसर्जनाच्या काळात तीन पाळ्यांमध्ये ९० जीवरक्षक नियुक्त करण्यात येणार असून, आणीबाणीच्या परिस्थितीसाठी ३० जीवरक्षक मध्यवर्ती अग्निशमन केंद्रात राखीव ठेवण्यात येणार आहेत. घाटांवर अतिरिक्त दोरखंड आणि लाइफ जॅकेटचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.

Ganesh Visarjan Ghats
Pune Sports Facilities: महापालिकेच्या क्रीडा कारभाराचा फज्जा; पुण्यातील सहा क्रीडा सुविधा सील!

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने क्षेत्रीय कार्यालयनिहाय नियोजन केले आहे. गर्दीच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार फिरती स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शहरातील तलाव, विहिरी आणि कालव्यालगतही विसर्जनाची व्यवस्था केली आहे. १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान विविध विसर्जनाच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

पर्यावरणपूरक विसर्जनाला चालना देतानाच नागरिकांची सुरक्षितता आणि स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे. नागरिकांनी प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम हौदांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष वारुळे यांनी केले आहे.

Ganesh Visarjan Ghats
Pune Ganeshotsav Farmer Help: ‘एक नोट शेतकऱ्यांसाठी’; पुण्यातील गणेश मंडळांनी किमान १०० शेतकऱ्यांचा वर्षभराचा खर्च उचलावा

दीड दिवसाच्या बाप्पाला आज भावपूर्ण निरोप

ढोल-ताशांचा गजर, आरत्यांचे मंगल स्वर आणि 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात सोमवारी घरोघरी विराजमान झालेल्या दीड दिवसाच्या बाप्पाला आज (दि. १५) भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. अवघ्या दीड दिवसांच्या पाहुणचारानंतर 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' म्हणत गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाणार असून, त्यासाठी शहरातील विविध विसर्जन घाट सज्ज झाले आहेत.

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोमवारी पुणेकरांनी लाडक्या गणरायाची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना केली. पूजा, आरती, नैवेद्य आणि नातेवाईक-मित्रमंडळींच्या भेटीगाठींमुळे घराघरांत दिवसभर उत्साहाचे वातावरण होते. दीड दिवसाचा गणपती असलेल्या घरांमध्ये मंगळवारी सकाळपासून उत्तरपूजा आणि विसर्जनाची लगबग सुरू होणार आहे. त्यानंतर कुटुंबीयांसह बाप्पाला विसर्जनस्थळी नेऊन भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. दीड दिवसाच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी महापालिका प्रशासनाकडून शहरातील विविध ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.

महापालिकेची विसर्जनासाठी तयारी

  • नदीपात्र : ३७ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था

  • घाट : ३५ घाटांवर विसर्जनाची व्यवस्था

  • बांधलेले कृत्रिम हौद : ३८ ठिकाणी, ६९ हौद

  • लोखंडी टाक्या : २८१ ठिकाणी, ६४८ टाक्या

  • तलाव : ४

  • विहिरी : ७

  • कॅनॉल : ४१

  • निर्माल्य कलश/कंटेनर : २७४ ठिकाणी, ३२८ कलश

  • मूर्ती संकलन/दान केंद्रे : २४१

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news