Pune Alcohol Sale Ban: बाप्पाच्या विसर्जनाला दारूला 'नो एंट्री'! शहरात एक्साईज'चा वॉच

मद्यविक्रीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची विशेष पथके तैनात; विसर्जन मार्गांवर कडक नजर
Pune Alcohol Sale Ban
Pune Alcohol Sale BanPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.२५) संपूर्ण पुण्यात मद्यविक्री बंद राहणार आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी 'ड्राय डे' घोषित करण्यात आला असून, मद्यविक्रीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष पथके तैनात केली आहेत. मध्यवर्ती पुण्यासह विसर्जन मिरवणुकीच्या मार्गांवर या पथकांकडून विशेष नजर ठेवली जाणार आहे.

Pune Alcohol Sale Ban
Pune Ganesh Visarjan 2026: पुण्यात बाप्पाला निरोप देण्यासाठी यंत्रणा सज्ज! १५ घाटांवर १२० जीवरक्षक, ३९० CCTV अन् ४,१३० फ्लड लाइट

गणेशोत्सवाच्या सुरुवातीला १४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशीही पुण्यात मद्यविक्री बंद ठेवली होती. त्यानंतर आता २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुसरा ड्राय डे राहणार आहे. पुण्यात गणेशोत्सवाच्या कालावधीत संपूर्ण शहरासाठी दोनच दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, गणेश विसर्जनाच्या दिवशी मध्यवर्ती पुण्यात लाखो नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. प्रमुख विसर्जन मार्ग, मंडई, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता तसेच गर्दीच्या परिसरात मद्याची अवैध विक्री किंवा वाहतूक होऊ नये, यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.

Pune Alcohol Sale Ban
Pune Weather Today: आज शहरात दिवसा कडक ऊन, सायंकाळी हलक्या पावसाची शक्यता

पुणे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनात पथके तैनात केली असून, विशेषतः मध्यवर्ती भागात मद्य विक्रीची दुकाने, संशयास्पद ठिकाणे आणि प्रमुख मार्गांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. ड्राय डेच्या दिवशी आदेशाचे उल्लंघन करून मद्यविक्री करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news