Pune Weather Today: आज शहरात दिवसा कडक ऊन, सायंकाळी हलक्या पावसाची शक्यता

शुक्रवारी दिवसभर मोठ्या पावसाची शक्यता कमी; उन्हाचा तडाखा जाणवणार, नागरिकांना पाणी-छत्री सोबत ठेवण्याचा सल्ला
Pune Weather Today
Pune Weather TodayPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीवर शुक्रवारी दिवसभर मोठ्या पावासाची शक्यता नाही. मात्र, हलका पाऊस सायंकाळी हजेरी लावू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

परतीचा मान्सून सध्या गुजरात आणि मध्य प्रदेशात पोहोचला आहे. तेथून तो महाराष्ट्राकडे येत आहे. मात्र, मान्सून कमजोर स्थितीत असल्याने परतीच्या पावसाचा जोर कमी आहे. त्यामुळे पुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीवर शुक्रवारी पावसाची शक्यता कमीच आहे.

Pune Weather Today
Pune Ganesh Visarjan Bus Routes: गणेश विसर्जनासाठी पुण्यात बससेवा बदलली! स्वारगेट-डेक्कनहून बस कुठून सुटणार? पाहा संपूर्ण यादी

सायंकाळच्या वेळी हलक्या सरी हजेरी लावून जातील, असा अंदाज आहे. दिवसा कडक ऊन राहणार असल्याने नागरिकांनी टोपी, छत्री रुमाल, पाण्याची बाटली सोबत ठेवावी, असा सल्ला हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे. शनिवारपासून (२६ सप्टेंबर) मात्र शहरातील पावसाची शक्यता पूर्ण कमी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news