

Pune Ganesh Visarjan Traffic: पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचे वाहतूक निर्बंध जाहीर केले आहेत. २४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजल्यापासून मुख्य विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत शहरातील प्रमुख रस्त्यांवर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी ‘नो पार्किंग’ लागू करण्यात येणार आहे.
नागरिकांनी या कालावधीत संबंधित रस्त्यांवर वाहने पार्क करू नयेत, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. या रस्त्यांवरील नियमित पार्किंग व्यवस्थाही या कालावधीत तात्पुरती स्थगित करण्यात येणार आहे.
१. लक्ष्मी रोड: संत कबीर चौक ते अलका टॉकीज चौक
२. केळकर रोड: बुधवार चौक ते अलका टॉकीज चौक
३. कुमठेकर रोड: शनिपार चौक ते अलका टॉकीज चौक
४. टिळक रोड: जेधे चौक ते अलका टॉकीज चौक
५. बाजीराव रोड: पुरम चौक ते फुटका बुरुज चौक
६. शिवाजी रोड: गाडगीळ पुतळा ते जेधे चौक
७. शास्त्री रोड: सेनादत्त पोलीस चौकी ते अलका टॉकीज चौक
८. जंगली महाराज रोड: झाशी राणी चौक ते खंडोजी बाबा चौक
९. कर्वे रोड: नळस्टॉप ते खंडोजी बाबा चौक
१०. फर्ग्युसन कॉलेज रोड: खंडोजी बाबा चौक ते गुडलक चौक
याशिवाय खंडोजी बाबा चौक ते हॉटेल वैशालीला जोडणाऱ्या उपरस्त्यांच्या १०० मीटर परिसरातही पार्किंगला बंदी राहणार आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात जड वाहनांसाठीही महत्त्वाचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. २५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून २६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत, म्हणजेच तब्बल ४८ तास संपूर्ण पुणे शहरात सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
१) जंगली महाराज रोड : झाशी राणी चौक,
२) शिवाजी रोड : काकासाहेब गाडगीळ पुतळा
३) मुदलियार रोड :- अपोलो टॉकीज / दारूवाला पूल
४) लक्ष्मी रोड :- संत कबीर पोलीस चौकी
५) सोलापूर रोड :- सेक्शन लष्कर चौक
६) सातारा रोड : व्होल्गा चौक
७) बाजीराव रोड : सावरकर पुतळा चौक
८) लाल बहादूर शास्त्री रोड : सेनादत्त पोलीस चौकी
९) कर्वे रोड :- नळस्टॉप
१०) फर्ग्युसन कॉलेज रोड : गुडलक चौक
गणेश विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यानंतर शहरातील अनेक प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना अडचणी येऊ नयेत यासाठी पुणे पोलिसांनी डायव्हर्शन पॉईंट्स आणि रिंग रोडचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
नागरिकांनी शक्यतो मिरवणुकीच्या मार्गावर जाणे टाळावे आणि प्रवासासाठी पोलिसांनी सुचवलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि प्रतिबंधित रस्त्यांवर वाहने पार्क करू नयेत, असे पुणे शहर वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.