Pune Fish Prices: पश्चिम किनारपट्टीवरील मासेमारी बंद; पुण्यात मासळीच्या दरात 20% पर्यंत वाढ

समुद्री मासळीची आवक घटल्याने बाजारात दर तेजीत; 5 जूननंतर दर कमी होण्याची शक्यता
Fish
Fish Pudhari File Photo
Published on
Updated on

पुणे: देशाच्या पूर्व किनारपट्टीवर मासेमारी पूर्णपणे बंद असून, सोमवार (दि. 1) पासून पश्चिम किनारपट्टीवरील मासेमारीही बंद होत आहे. त्यामुळे, गणेश पेठ येथील मासळीबाजारात समुद्री मासळीची आवक घटली आहे. कोळंबी वगळता सर्व मासळीच्या भावात मागील आठवड्याच्या तुलनेत दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोळंबीचे दर मात्र स्थिर आहेत. पाच जून पासून पूर्वेकडील किनारपट्टीवरील मासेमारीला सुरवात होईल. त्यानंतर, येथून आवक सुरू होऊन दर काहीसे कमी होतील. मागणी-पुरवठ्यात समतोल असल्याने मटण, चिकन आणि गावरान अंडीचे भाव स्थिर आहेत. मात्र, इंग्लिश अंड्याच्या दरात शेकड्यामागे 20 रुपयांची वाढ झाली आहे.

Fish
Maharashtra 11th Admission: अकरावी प्रवेशात मोठा दिलासा; हमीपत्रावर प्रवेशास परवानगी, गुणपत्रकाची सक्ती नाही

गणेश पेठ येथील घाऊक बाजारात रविवारी (दि. 31) खोल समुद्रातील मासळी 8 ते 10 टन, खाडीच्या मासळीची सुमारे 200 ते 300 किलो आणि नदीच्या मासळीची 500 ते 700 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे 10 ते 15 टन इतकी आवक झाल्याची माहिती मासळीचे व्यापारी ठाकुर परदेशी, चिकनचे विक्रेते रूपेश परदेशी आणि मटण विक्रेते संघटनचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी दिली.

Fish
PMC Property Tax: पुणे महापालिकेचे मिळकतकर पोर्टल दोनदा ठप्प; शेवटच्या दिवशी करदात्यांची धावपळ

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):

पापलेट : कापरी : 2000-2500, मोठे : 1800-2000, मध्यम : 1400-1700, लहान : 1100-1300, भिला : 900-1000, हलवा : 900-1100, सुरमई 1200-1500, रावस : 1000-1100, घोळ : 900-1000, करली : 400-480, करंदी (सोललेली) : 450-550, भिंग : 450-500, पाला : 1000-1200, वाम : पिवळी 1000-1200, काळी : 550-650, ओले बोंबील : 350-450.

Fish
Marathi Theatre Discussion: मराठी रंगभूमीला नव्या दिशेची गरज; श्रीराम लागू नाट्य महोत्सवात रंगले विचारमंथन

कोळंबी : लहान : 250-350, मध्यम : 400-550, मोठी : 600-700, जम्बो प्रॉन्स : 1500-1600, किंग प्रॉन्स : 800-900, लॉबस्टर : 2200-2400, मोरी : 400-500, मांदेली : 140-180, राणीमासा : 250-320, खेकडे : 320-400, चिंबोऱ्या : 600-700. खाडीची मासळी - सौंदाळे : 300-350, खापी : 300-350, नगली : 500-600, तांबोशी : 600-650, पालू : 400-450, लेपा : 300-350, बांगडा : 250-300, शेवटे : 250-300, पेडवी : 150-200, बेळुंजी : 150-200, तिसऱ्या : 300-350, खुबे : 150-200, तारली : 200-250.

Fish
Pune Census 2027 Action: जनगणना कामात हलगर्जीपणा; हडपसर-मांजरीतील 25 प्रगणकांवर गुन्हे दाखल

नदीतील मासळी : रहू : 160-200, कतला : 180-250, मरळ : 350-400, शिवडा : 250, खवली : 250, आम्ळी : 150, खेकडे : 300-400, चिलापी : 80-160, वाम : 550-600. मटण : बोकडाचे 800, बोलाईचे 800, खिमा 800, कलेजी 840. चिकन 240, लेगपीस 290, जिवंत कोंबडी 180, बोनलेस 340. अंडी : गावरान (शेकडा) 1100 डझन 140, प्रतिनग 12. इंग्लिश (शेकडा) 620, डझन 84, प्रतिनग 7.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news