Pune Fish Price: पुण्यात मासळीचे दर तेजीत; कमी आवकामुळे भाव वाढले

पूर्व किनारपट्टीवर मासेमारी बंद; मटण, चिकन आणि अंडीचे दर स्थिर
Fish
Fish Pudhari
Published on
Updated on

पुणे: देशाच्या पूर्व किनारपट्टीवरून पूर्णपणे मासेमारी बंद आहे. पश्चिम किनारपट्टीवर गुजरात ते केरळ येथून आवक होत आहे. नेहमीच्या तुलनेत आवक कमी असल्याने सर्व प्रकारच्या मासळीचे भाव तेजीत आहेत. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे मटण, चिकन आणि अंडीचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.

Fish
Pune University SET Exam: पुणे विद्यापीठाची SET परीक्षा वेळेतच; डॉ. प्रभाकर देसाई समन्वयकपदी

गणेश पेठ येथील घाऊक बाजारात रविवारी (दि. 19) खोल समुद्रातील मासळी 10 ते 15 टन, खाडीच्या मासळीची सुमारे 200 ते 400 किलो आणि नदीच्या मासळीची 600 ते 700 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे 15 टन इतकी आवक झाली होती.

Fish
Maharashtra RTE Admission: आरटीई प्रवेश प्रक्रियेत गोंधळ; 1.14 लाख जागांपैकी फक्त 26 हजार प्रवेश निश्चित

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):

पापलेट : कापरी : 1800-2000, मोठे : 1600-800, मध्यम : 1400-1500, लहान : 1100-1200, भिला : 900-1000, हलवा : 800-1000, सुरमई 800-1200, रावस : 800-1000, घोळ : 800-1000, करली : 350-400, करंदी (सोललेली) : 400-450, भिंग : 400-450, पाला : 1200-1400, वाम : पिवळी 900-1100, काळी : 300-400, ओले बोंबील : 350-450.

Fish
Pune Airport Flight Disruption: पुणे विमानतळावर लढाऊ विमानाचा अपघात; 9 तास उड्डाणे ठप्प

कोळंबी : लहान : 250-360, मध्यम : 350-500, मोठी : 550-750, जम्बो प्रॉन्स : 1500-1600, किंग प्रॉन्स : 800-900, लॉबस्टर : 2000-2200, मोरी : 350-400, मांदेली : 120-160, राणीमासा : 250-300, खेकडे : 300-400, चिंबोऱ्या : 700-1000. खाडीची मासळी - सौंदाळे : 250-300, खापी : 250-300, नगली : 450-500, तांबोशी : 550-650, पालू : 250-300, लेपा : 350-400, बांगडा : 250-300, शेवटे : 350-400, पेडवी : 150-200, बेळुंजी : 150-200, तिसऱ्या : 250-300, खुबे : 150-200, तारली : 200-250.

Fish
Maharashtra Lek Ladki Yojana: ‘लेक लाडकी’ योजनेतून पुण्यात 9,482 मुलींना 4.74 कोटींचा लाभ

नदीतील मासळी : रहू : 160-180, कतला : 180-240, मरळ : 350-450, शिवडा : 200-250, खवली : 200-250, आम्ळी : 120-180, खेकडे : 250-400, चिलापी : 80-180, वाम : 550-600. मटण : बोकडाचे 800, बोलाईचे 800, खिमा 800, कलेजी 840. चिकन 240, लेगपीस 290, जिवंत कोंबडी 180, बोनलेस 340. अंडी : गावरान (शेकडा) 1100 डझन 140, प्रतिनग 12. इंग्लिश (शेकडा) 505, डझन 72, प्रतिनग 6.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news