Maharashtra Lek Ladki Yojana: ‘लेक लाडकी’ योजनेतून पुण्यात 9,482 मुलींना 4.74 कोटींचा लाभ

मुलींच्या जन्माला प्रोत्साहन; शिक्षण व सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषदेचे आवाहन
Lek Ladki Yojana
Lek Ladki YojanaPudhari
Published on
Updated on

पुणे: राज्यातील मुलींच्या जन्माला प्रोत्साहन मिळावे म्हणून सुरू केलेल्या ‌‘लेक लाडकी योजने‌’अंतर्गत जिल्ह्यात 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या 9 हजार 482 मुलींना मागील तीन वर्षांत 4 कोटी 74 लाख 10 हजार रुपये लाभ देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली आहे. तसेच, या योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Lek Ladki Yojana
Pune Mango Festival Illegal Vendors: मार्केट यार्डात ‘आंबा महोत्सवा’बाहेर अनधिकृत विक्रेत्यांचा सुळसुळाट

पहिला हप्ता प्रतिलाभार्थी 5 हजार रुपयाप्रमाणे सन 2023-24 मध्ये 1 हजार 40 मुलींना 70 लाख रुपये, सन 2024-25 मध्ये 5 हजार 720 मुलींना 2 कोटी 86 लाख रुपये आणि सन 2025-26 मध्ये 2 हजार 362 मुलींना 1 कोटी 18 लाख 10 हजार रुपयांचा लाभ देण्यात आलेला आहे. मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, मुलीचा मृत्युदर कमी करणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने ‌‘लेक लाडकी योजना‌’ सुरू करण्यात आली आहे.

Lek Ladki Yojana
Maharashtra Vehicle Fitness Extension: एटीएस गोंधळावर तोडगा; वाहन फिटनेसला ऑक्टोबर 2026 पर्यंत मुदतवाढ

मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत 6 हजार रुपये, इयत्ता सातवीत 7 हजार, इयत्ता अकरावीत 8 हजार, मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 75 हजार रुपये, असे मिळून 1 लाख 1 हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, बालकल्याण सभापती अंकिता पाटील यांनी जिल्ह्यातील स्त्री-पुरुष प्रमाण संतुलित राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासोबतच महिला सक्षमीकरणाकरिता प्रभावी योजनांची आखणी करून अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news