Pune Firing Incident: पुण्यात भरदिवसा गोळीबाराने खळबळ; घोरपडे पेठ, लोहियानगरमध्ये दोन घटना, सहा राऊंड फायर

पोलिस चौकीजवळच तरुणावर गोळीबार; पूर्वीच्या वादातून हल्ल्याचा संशय, एका घटनेत तरुण जखमी तर दुसऱ्यात अल्पवयीन आरोपींचा सहभाग
Guns
GunsPudhari
Published on
Updated on

पुणे: पुण्यात गुंडांना पोलिसांचे भय उरले आहे की नाही, असाच सवाल उपस्थित होऊ लागला आहे. दिवाळीचे फटाके फोडावेत तसे भर दिवसा पिस्तूलातून गोळीबार केला जाऊ लागला आहे. शहराच्या मध्य वस्तीतील घोरपडे पेठ व लोहियानगर परिसरात शुक्रवारी (दि.२४) दिवसभरात गोळीबाराच्या दोन घटना घडल्या. त्यातील एक घटना पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर घडली आहे. पूर्वीच्या वादातून हे गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. भर दिवसा एकाच पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन गोळीबाराच्या घटना घडल्याने एकच खळबळ उडला असून, दोन घटनांत सहा राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती आहे.

Guns
Pune Crime: ग्रेनाडात पतीचा संशयास्पद मृत्यू; न्यायासाठी पुण्यातील पत्नीची परदेशातून सत्य शोधण्याची धडपड

पहिली घटना घोरपडे पेठ पोलिस चौकीसमोरच घडली असून, दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी एका तरुणावर गोळीबार केला. दोघांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. एक गोळी तरुणाला लागली असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ख्वाजा उद्दीन नशीर शेख (वय २८, रा. नाडे गल्ली, गणेश पेठ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी, खडक पोलिसांनी सोनू ऊर्फ मोंटू अनिल परदेशी (वय २७), पियूष ऊर्फ जय अनिल परदेशी (वय २५), सुजल सुनील परदेशी (वय २२) , नितेश रिकब (वय २२, राहणार सर्व काशेवाडी, घोरपडे पेठ) यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या इतर साथीदारांवर आर्म ॲक्टसह खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घोरपडे पेठेतील अनुसया टॉवरसमोर पोलिस चौकीपासून जवळ घडली आहे. याबाबत शेख याने फिर्याद दिली आहे.

Guns
PMPML Revenue Growth: तोट्यातील पीएमपीएमएलला सुधारणांचा डोस; चार वर्षांत उत्पन्नात १२० टक्के वाढीचा प्रशासनाचा दावा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ख्वाजा शेख याच्यावर यापूर्वीचा एक खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद आहे. आरोपी परदेशीपैकी काही जणांवर स्वारगेट पोलिस ठाण्यात गेल्या काही दिवसांपूर्वी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये ते फरार होते. शेख याच्या चुलत्याने २००५ मध्ये सोनू उर्फ मोंटू याचे वडील अनिल परदेशी यांचा खून केला होता. त्या कारणातून परदेशी व शेख यांच्यात वाद होते. ख्वाजा हा एका नातेवाइकाच्या दहाव्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मोमीनपुरा कब्रस्तान येथे सकाळी ९ वाजताच्या सुमारास आला होता. तेव्हापासून आरोपी त्याच्या पाळतीवर होते. सव्वाअकरा वाजताच्या सुमारास नातेवाइकाच्या घरी जात असताना, घोरपडे पेठेतील अनुसया टॉवर्सच्या समोर आरोपी पैकी सोनू परदेशी याने त्याच्याकडील पिस्तूल रोखून तुझ्या नातेवाइकांनी माझ्या वडिलांना मारले होते.

Guns
PMPML 474 Crore Fund: पीएमपीएमएलच्या ४७४ कोटींच्या मदतीवरून महापालिकेत रणसंग्राम; भरती घोटाळ्याच्या चौकशी अहवालावरून गदारोळ

त्यामुळे तुला देखील आम्ही मारून टाकू, असे म्हणून त्याच्या दिशेने गोळीबार केला. त्या वेळी एक गोळी ख्वाजा याच्या पाठीत लागली. त्याच वेळी पियूष याने देखील त्याच्याकडील पिस्तूलातून ख्वाजा याच्यावर गोळी झाडली. तर, एक गोळी हवेत फायर केली. आरोपींनी ख्वाजा याच्यावर तीन राऊंड फायर केल्याची माहिती आहे. दरम्यान, प्रसंगावधान राखत ख्वाजा याने आपला जीव वाचवत तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच खडक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ख्वाजा याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. तर, चौघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गोळीबाराच्या घटनेला काहीसा कालावधी लोटतो आहे ना तोपर्यंतच सायंकाळी सहा ते साडेसहा वाजताच्या सुमारास पीएमसी कॉलनी क्रमांक ९ लोहियानगर परिसरात गोळीबाराची घटना घडली.

Guns
PMPML Financial Loss: पीएमपीएमएलच्या कारभारावर महापालिकेत संताप; तोटा, निकृष्ट सेवा आणि अनियमिततेवर नगरसेवक आक्रमक

पूर्वीच्या वादातून हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. गोळीबार करणारे आरोपी आणि गोळीबार झालेला तरुण हे सर्व अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. सुदैवाने या गोळीबारात कोणी जखमी झालेले नाही. आरोपीने तीन ठिकाणी हवेत गोळीबार केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले, सहायक पोलिस आयुक्त सचिन हिरे, खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली.

पूर्वीच्या वादातून हे गोळीबार झाले आहेत. पहिल्या घटनेत चौघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तरुणाला एक गोळी लागली असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, दुसऱ्या घटनेत कोणी जखमी नाही. हवेत तीन राऊंड फायर करण्यात आले आहेत. या घटनेतील गोळीबार करणारे आरोपी अल्पवयीन आहेत. पुढील तपास सुरू आहे.

शशिकांत चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक खडक पोलिस ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news