Pune Crime: ग्रेनाडात पतीचा संशयास्पद मृत्यू; न्यायासाठी पुण्यातील पत्नीची परदेशातून सत्य शोधण्याची धडपड

हडपसरच्या मोनिका अरणे यांचा आरोप; वैद्यकीय कागदपत्रे, शवविच्छेदन अहवाल व सामानातील विसंगतींची स्वतंत्र चौकशीची मागणी
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

पुणे: ‘माझे पती वेस्ट इंडीजमध्ये नोकरीसाठी गेले. कुटुंबासाठी चांगले अर्थार्जन होईल म्हणून अकरा वर्षांच्या मुलासह मी पुण्यातच थांबले. पण सहा महिन्यांतच पतीचा मृतदेह घरी आला आणि आमचे आयुष्य काळोखात गेले. मला काहीच समजेनासे झाले. अखेर हिंमत बांधून मी स्कूटरवर मुलाला घेऊन दिल्लीचे भारतीय दूतावास गाठले, पण तिथेही पदरी निराशा आली!’ हे उद्‌गार आहेत पुण्यातील हडपसर परिसरात राहणाऱ्या मोनिका अरणे यांचे.

Crime News
PMPML Revenue Growth: तोट्यातील पीएमपीएमएलला सुधारणांचा डोस; चार वर्षांत उत्पन्नात १२० टक्के वाढीचा प्रशासनाचा दावा

मोनिका अरणे या कुठेच दाद मिळत नाही, म्हणून काही दिवसांपूर्वी थेट दै. ‘पुढारी’च्या कार्यालयात आल्या आणि त्यांनी आपली आपबितीच विशद केली. पतीचे संशयास्पदरीत्या निधन झाले. या घटनेची सखोल, निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी करावी, अशी माझी मागणी आहे. या प्रकरणात वैद्यकीय नोंदी, रुग्णालयातील उपचार, नियोक्त्याचे वर्तन, सामानाची पाठवणी, व्हिसा, वर्क परमिट तसेच भारत आणि ग्रेनाडा येथील संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत अनेक गंभीर विसंगती असल्याचा आरोप त्यांनी केला.

Crime News
PMPML 474 Crore Fund: पीएमपीएमएलच्या ४७४ कोटींच्या मदतीवरून महापालिकेत रणसंग्राम; भरती घोटाळ्याच्या चौकशी अहवालावरून गदारोळ

मृत्यूनंतर पतीचे पूर्ण सामान मिळालेच नाही

मृत्यूनंतर पतीचे ॲपल लॅपटॉप, मोबाईल आणि इतर साहित्य 'वैयक्तिक सामान'ऐवजी 'व्यावसायिक माल' म्हणून पाठविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सामानाच्या वजनात सुमारे सात किलोची तफावत असून, पॅकिंगपूर्वी कोणतीही पडताळणी करण्यात आली नसल्याचेही अरणे यांनी म्हटले आहे.

Crime News
PMPML Financial Loss: पीएमपीएमएलच्या कारभारावर महापालिकेत संताप; तोटा, निकृष्ट सेवा आणि अनियमिततेवर नगरसेवक आक्रमक

शवविच्छेदनाचा अहवालही नाही...

रुग्णालयातील प्रवेशपत्र, डिस्चार्ज समरी, रक्त तपासणी व शवविच्छेदन अहवाल उपलब्ध करून देण्यात आलेले नसल्याचा दावा करत त्यांनी ही माहिती जाणीवपूर्वक दडवली जात असल्याचा आरोप केला आहे. याशिवाय, व्हिसा, वर्क परमिट, कामगार विमा, कथित विषप्रयोगाचा दावा, व्हॉट्सॲपवरून आलेली अवयव तस्करीची धमकी आणि १० नोव्हेंबर २०२५ रोजी पतीचा मोबाईल भारतात सक्रिय असल्याच्या संशयाचीही स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. संपूर्ण प्रकरणाचा स्वतः पाठपुरावा करण्यासाठी ग्रेनाडाला जाण्यासाठी व्हिसा मंजूर करण्यात यावा, अशीही त्यांनी मागणी केली आहे.

Crime News
Pune Student Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात जनआक्रोश; हजारो विद्यार्थ्यांचा तिरंगा मोर्चा, घोषणांनी दणाणला लाल महाल

...असा आहे घटनाक्रम

मोनिका यांचे पती मनोज हे ग्रेनाडा येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात, त्यांनी बर्गेन हाऊस कंपनी, ग्रेनाडा पोलिस, भारतीय उच्चायुक्तालय आणि संबंधित प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. रुग्णालयात उपचार सुरू असताना पतीशी थेट संपर्क साधू दिला गेला नाही किंवा व्हिडीओ कॉलद्वारे त्यांची ओळख पटविण्याची संधी नाकारण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच ठोस वैद्यकीय पुराव्यांशिवाय फुफ्फुसाच्या कर्करोगाचा दावा करण्यात आल्याने त्याबाबतही चौकशीची मागणी केली आहे.

माझ्या पतीचा मृत्यू अत्यंत संशयास्पद परिस्थितीत झाला आहे. या प्रकरणातील प्रत्येक बाबीची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य बाहेर यावे आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, हीच माझी अपेक्षा आहे. माझ्या पतीला न्याय मिळेपर्यंत मी कायदेशीर लढा सुरू ठेवणार आहे.

मोनिका अरणे (पीडित पत्नी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news