PMPML 474 Crore Fund: पीएमपीएमएलच्या ४७४ कोटींच्या मदतीवरून महापालिकेत रणसंग्राम; भरती घोटाळ्याच्या चौकशी अहवालावरून गदारोळ

दहा तास चाललेल्या विशेष सभेचा घोषणाबाजीने शेवट; विरोधकांचा सभात्याग, संचालन तुटीसाठी निधी देण्याचा ठराव मंजूर
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पुणे: महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) वाढत्या आर्थिक तुटीची भरपाई करण्यासाठी महापालिकेकडून शेकडो कोटी रुपयांची मदत देण्यापूर्वी महामंडळातील कथित भरती घोटाळा, गैरव्यवहार, गैरकारभार आणि आर्थिक शिस्तीवर सविस्तर चर्चा व्हावी, या मागणीसाठी शुक्रवारी विशेष सभा बोलावली होती. मात्र, सभेदरम्यान पीएमपीएमएलचे माजी अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्या कार्यकाळातील कथित भरती घोटाळा व गैरव्यवहारांच्या चौकशी अहवालावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष रंगला. दहा तास चाललेल्या सभेचा शेवट घोषणाबाजी, गदारोळ आणि विरोधकांच्या सभात्यागाने झाला.

Pune Municipal Corporation
PMPML Financial Loss: पीएमपीएमएलच्या कारभारावर महापालिकेत संताप; तोटा, निकृष्ट सेवा आणि अनियमिततेवर नगरसेवक आक्रमक

महामंडळाच्या सातत्याने वाढणाऱ्या तुटीचा भार पुन्हा महापालिकेवर टाकण्यापूर्वी पीएमपीएमएलच्या आर्थिक कारभाराचा, महसूल वाढविण्याच्या उपाययोजनांचा, प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा तसेच देवरे यांच्या कार्यकाळातील कथित भरती घोटाळा आणि गैरव्यवहारांचा जाब घेतला जावा, अशी भूमिका अनेक नगरसेवकांनी मांडली होती. त्यामुळे या विशेष सभेत चौकशी अहवालाचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला.

Pune Municipal Corporation
Pune Student Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात जनआक्रोश; हजारो विद्यार्थ्यांचा तिरंगा मोर्चा, घोषणांनी दणाणला लाल महाल

विरोधी पक्षनेते ॲड. नीलेश निकम यांनी देवरे यांच्या कार्यकाळातील भरती घोटाळा आणि इतर कथित गैरव्यवहारांवरील चौकशी अहवाल तातडीने सभागृहात सादर करण्याची मागणी केली. महापालिका शेकडो कोटी रुपयांची मदत देत असताना संबंधित चौकशीची माहिती सभागृहापासून का लपवली जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘अधिकारी गैरव्यवहार करून निघून जातील आणि लोकप्रतिनिधींना त्याची माहितीच मिळणार नाही, हे मान्य करता येणार नाही,’ असेही निकम यांनी स्पष्ट केले.

Pune Municipal Corporation
Khed Encroachment: 'अबब..३७३ दुकानांवर फिरणार बुलडोझर..! 24 तासांत बांधकाम हटवा, अन्यथा कारवाई

यावर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी शासन स्तरावर सुरू असून अहवाल शासनाकडे पाठविल्याचे सांगितले. आवश्यक वाटल्यास पक्षनेत्यांना माहिती दिली जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र, विरोधकांनी अहवाल सर्वसाधारण सभागृहातच सादर करण्याचा आग्रह कायम ठेवला.

Pune Municipal Corporation
Crop Insurance: दोन हजार शेतकऱ्यांना ५ कोटींचा पीक विमा; पुरंदरच्या कांदा उत्पादकांना दिलासा

दरम्यान, सभागृह नेते गणेश बिडकर यांनी चर्चेदरम्यान ‘तुम्हाला बातमीसाठी वॉकआऊट करायचा आहे का?’ अशी टिप्पणी केल्याने वातावरण आणखी तापले. या वक्तव्याचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)सह विरोधी पक्षातील नगरसेवकांनी सभात्याग केला.

या सर्व गदारोळातच पीएमपीएमएलच्या सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील संचालन तुटीपोटी महापालिकेच्या वाट्याचे ४७४.०१ कोटी रुपये बारा समान हप्त्यांमध्ये देण्याचा ठराव सत्ताधाऱ्यांनी मंजूर करून घेतला. त्यानंतर दुसरी सभा सुरू करून एक विषय मंजूर केला. उर्वरित विषयांवरील चर्चा न करताच सभा पुढील बुधवारी तहकूब केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news