Pune FDA Paneer Khoya Seizure: पुण्यात ३१ लाखांचा भेसळीचा संशय असलेला पनीर-खवा जप्त करून नष्ट; एफडीएची मोठी कारवाई

कर्नाटकातून विक्रीसाठी आणलेला १० हजार ८८८ किलो साठा जप्त; बावधन, कसबा पेठ आणि बिबवेवाडीत कारवाई
FDA Paneer Khoya Seizure
FDA Paneer Khoya SeizurePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: दसरा दिवाळी सणाच्या तोंडावर कर्नाटकातून पुण्यात विक्रीसाठी आणलेले १० हजार ८८८ किलो पनीर आणि खवा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शनिवारी जप्त करून तातडीने नष्ट केले. या साठ्याची किंमत तब्बल ३१ लाख सहा हजार ६८० रुपये असून बावधन, कसबा पेठ आणि बिबवेवाडी येथे सोमवारी सकाळपासून ही कारवाई करण्यात आली.

FDA Paneer Khoya Seizure
Sawai Gandharva Bhimsen Mahotsav 2027: सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदा जानेवारीत; १३ ते १७ जानेवारी २०२७ दरम्यान फर्ग्युसन मैदानावर रंगणार

दरम्यान, महिनाभरात दुसऱ्यांना दुग्धजन्य पदार्थांच्या एवढ्या मोठ्या मालावर कारवाई होत असल्याने नागरिकांच्या ताटातील अन्नाच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, सामान्य नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

FDA Paneer Khoya Seizure
Pune PMPML New Buses: पुणेकरांसाठी वर्षभरात २,५०० नव्या पीएमपी बस; डेपोंच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे आयुक्तांचे आदेश

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत पनीरची वाहतूक व साठवणूक अनियंत्रित तापमानात होत असल्याचे आढळून आले. तसेच, लो फॅट आणि मीडियम फॅट पनीर सीलबंद स्वरूपात विक्री करणे अपेक्षित असताना ते विनासील आणि खुल्या स्वरुपात विक्री केले जात असल्याचे आढळून आले.

FDA Paneer Khoya Seizure
Pune Graduate Constituency Election: पुणे पदवीधर निवडणुकीत डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयासाठी महायुतीचे सांघिक प्रयत्न; दत्तात्रय भरणे यांची ग्वाही

हे पदार्थ मानवी सेवनासाठी असुरक्षित असल्याचा संशय व्यक्त करून तपासणी करण्यात आली असता नमुन्यांमध्ये दोष आढळल्याने एफडीएने अन्नसुरक्षा व मानके कायद्यानुसार संपूर्ण माल तातडीने नष्ट केल्याचे पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले.

FDA Paneer Khoya Seizure
Padegaon Zilla Parishad School: पाडेगावच्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थिनीच्या पायाखाली विषारी साप; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

ग्राहकांच्या विश्वासाला तडा

सणासुदीला मिठाई, खवा, मावा आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढत असताना वारंवार समोर येणाऱ्या अशा प्रकारांमुळे ग्राहकांच्या विश्वासाला तडा जात आहे. दुधाच्या पदार्थांमध्ये वनस्पतीजन्य फॅट किंवा इतर घटकांची अनधिकृत भेसळ करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कोठे किती साठा जप्त

  • बावधन : ३,५२० किलो पनीर; किंमत १०.५६ लाख रुपये.

  • कसबा पेठ : ३,२३५ किलो पनीर; किंमत ८.०३ लाख रुपये.

  • बिबवेवाडी : ३,४१३ किलो पनीर; किंमत १०.३१ लाख रुपये.

  • डेंगळे पूल, कसबा पेठ : शिवशंकर डेअरीत ७२० किलो खवा; किंमत २.१६ लाख रुपये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news