Sawai Gandharva Bhimsen Mahotsav 2027: सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदा जानेवारीत; १३ ते १७ जानेवारी २०२७ दरम्यान फर्ग्युसन मैदानावर रंगणार

पुणे पुस्तक महोत्सवामुळे तारखांमध्ये बदल; रसिकांच्या मागणीनुसार महोत्सवाचे स्थळ चौथ्यांदा बदलले
Sawai Gandharva Bhimsen Mahotsav
Sawai Gandharva Bhimsen Mahotsav Pudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: पुण्यातील सांस्कृतिक वैभवाचा भाग असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची दर वर्षी देशविदेशातील रसिक आतुरतेने वाट पाहतात. पण, यंदाच्या महोत्सवासाठी रसिकांना पुढील वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. दर वर्षी डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात रंगणारा हा महोत्सव यंदा दि. १३ ते १७ जानेवारी २०२७ मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, यंदा प्रथमच फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Sawai Gandharva Bhimsen Mahotsav
Pune PMPML New Buses: पुणेकरांसाठी वर्षभरात २,५०० नव्या पीएमपी बस; डेपोंच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे आयुक्तांचे आदेश

डिसेंबरमध्ये याच मैदानावर पुणे पुस्तक महोत्सव होणार असल्याने सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आजपर्यंत महोत्सवाचे स्थळ चौथ्यांदा बदलले आहे. रेणुका स्वरूप प्रशाला, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडा संकुल यानंतर आता फर्ग्युसन मैदानावर यंदाचा महोत्सव होणार आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या या महोत्सवाचे यंदाचे ७२ वे वर्ष आहे. किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. सवाई गंधर्व आणि स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांना समर्पित असलेल्या या महोत्सवात देश-विदेशातील दिग्गज कलाकारांसह नवोदित गायक-वादक आपल्या कलेचे सादरीकरण करतात. यंदा मात्र महोत्सवाच्या तारखांसह स्थळातही बदल करण्यात आला आहे.

Sawai Gandharva Bhimsen Mahotsav
Pune Graduate Constituency Election: पुणे पदवीधर निवडणुकीत डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयासाठी महायुतीचे सांघिक प्रयत्न; दत्तात्रय भरणे यांची ग्वाही

गेल्या काही वर्षांपासून मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडा संकुलात महोत्सवाचे आयोजन करण्यात येत होते. मात्र, रसिकांच्या मागणीनुसार यंदा स्थळ बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानाची निवड करण्यात आली आहे. महोत्सवासंबंधीचा इतर तपशील लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

Sawai Gandharva Bhimsen Mahotsav
Padegaon Zilla Parishad School: पाडेगावच्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थिनीच्या पायाखाली विषारी साप; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन

सुरुवातीला काही वर्षे रेणुका स्वरूप प्रशाला आणि त्यानंतर सुमारे ३५ वर्षे सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आयोजन न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शाळेच्या पटांगणावर करण्यात आले होते. २०१९ सालापासून महोत्सवाचे आयोजन मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडा संकुल येथे करण्यात येत होते. २०१९ ते २०२५ या काळात कोरोनाची २ वर्षे वगळता ५ वर्षे महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्रीय मंडळाच्या पटांगणावर करण्यात आले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीने पुण्यातील हा अत्यंत मानाचा संगीत महोत्सव फर्ग्युसन महाविद्यालयाच्या पटांगणावर व्हावा, यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आणि सर्वांना अत्यंत सोयीच्या असलेल्या मध्यवर्ती ठिकाणी यंदा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे, याचा आम्हाला आनंद आहे, असेही श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.

Sawai Gandharva Bhimsen Mahotsav
Tuljabhavani Temple Historical Records: तुळजाभवानीच्या नंदादीपासाठी पेशव्यांनी गावाचे उत्पन्न लावले; १७६६ च्या अप्रकाशित मोडी पत्रातून ऐतिहासिक माहिती उजेडात

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे डेक्कन एज्युकेशन सोसायटीशी जुने नाते आहे. यापूर्वी हा महोत्सव सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेच्या मैदानावर होत असे. आयोजक दुसऱ्या जागेच्या शोधात असताना त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात महोत्सव आयोजित करण्याबाबत विचारणा केली. मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे महोत्सव घेण्याचे निश्चित झाले. दर वर्षी डिसेंबरमध्ये सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आयोजित केला जातो. पण, याच काळात पुणे पुस्तक महोत्सव फर्ग्युसनच्या मैदानावर होत असतो. सवाई महोत्सवाचे यंदाचे पहिलेच वर्ष असल्याने गोंधळ टाळण्यासाठी आणि व्यवस्थापनात अडचणी येऊ नये, यासाठी महोत्सव जानेवारीमध्ये होणार आहे. पुढील वर्षी दोन्ही महोत्सवांच्या आयोजनाबाबत चर्चा करून समन्वय साधला जाईल.

डॉ. आनंद काटीकर, कार्यवाह, डेक्कन एज्युकेशन सोसायटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news